Dont Worry Group चा पवनी पालिकेवर महामाेर्चा

Pauni Nagar Palika News : ग्रुपच्यावतीने पालिकेला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
bhandara news, pauni
bhandara news, paunisaam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara News : विदर्भाची काशी म्हणून भंडारा जिल्ह्यातील पवनी शहराला ओळखले जाते. मात्र याच पवनी शहरातील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. या समस्यांचे निराकारण व्हावे यासाठी डोन्ट वरी ग्रुपच्यावतीने आज (शुक्रवार) पवनी पालिकेवर महामाेर्चा काढण्यात आला. (Maharashtra News)

bhandara news, pauni
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

उमद्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत डोन्ट वरी ग्रुपची स्थापना केली आहे. हा ग्रुप पवनी शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असताे. पालिकेने शहरातील विविध प्रश्नांची साेडवणूक करावी यासाठी शेकडाे युवकांनी (youth) आज महामाेर्चात सहभाग नाेंदविला हाेता.

bhandara news, pauni
Samruddhi Mahamarg News : डाॅ. दाभाेलकरांच्या मागणीनंतर स्वामी समर्थ भक्तावर गुन्हा दाखल, समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही केला हाेता दावा (पाहा व्हिडिओ)

पवनी शहरातील प्रफुल मेजर शहीद स्मारकाची झालेली दुरावस्था, पवनी शहर खड्डेमय, चिखलमय झाले आहे. शहरातील नागरिकांसाठी जलशुद्धीकरण केंद्र सुरू करून 24 तास पाण्याची व्यवस्था करावी, चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे ऐतिहासिक घाटांची व मोक्षदामांची डागडुजी करावी अशी ग्रुपच्यावतीने मागणी करण्यात आली.

bhandara news, pauni
Yuvak Congress News : संभाजी भिंडेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही : युवक काॅंग्रेसचा इशारा

दरम्यान नागरिकांच्या (citizens) समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी वार्ड निहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी ग्रुपच्यावतीने पवनी पालिका अधिका-यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. आजच्या भव्य महामोर्चात पवनी तालुक्यातील शेकडो युवक सहभागी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com