धुळे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काल दाखल झाल्यानंतर आज सर्व उमेदवारी अर्जांवर छाननी प्रक्रिया पार पडली. या दरम्यान एमआयएम पक्षाचे आमदार फारुक शहा यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरेगट शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेतलेला होता. मात्र गोटे यांचा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला असून फारुक शहा यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
धुळे (Dhule News) शहर मतदारसंघातुन ठाकरे गटाकडून माजी आमदार अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर एमआयएम कडून विद्यमान आमदार फारूक शहा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान गोटे यांनी शहा यांच्या अर्जावर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे फेटाळून लावण्यात आला असून, (MIM) एमआयएम पक्षाचे आमदार फारुक शहा यांनी अनिल गोटे यांच्या आक्षेपावर टीका केली आहे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी धुळे शहरातील २५ उमेदवारांपैकी फक्त माझ्याच उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला असल्याचा आरोप देखील फारूक शहा यांनी गोटे यांच्यावर केला आहे.
गोटेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट
धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार (Anil Gote) अनिल गोटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भेटायला या असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांची भेट घेतली असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील हे ठाकरे गट शिवसेनेचे धुळे शहर विधानसभेचे उमेदवार अनिल गोटे यांना साथ देणार का? हे बघणं अवचित्याच ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.