Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Dhule Accident News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात लग्न समारंभासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या कारला भरधाव पिकअपने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी.
SHIRPUR ROAD ACCIDENT: HUSBAND KILLED, WIFE SERIOUSLY INJURED IN DHULE
SHIRPUR ROAD ACCIDENT: HUSBAND KILLED, WIFE SERIOUSLY INJURED IN DHULESaam tv
Published On
Summary
  • शिरपूर तालुक्यात भरधाव पिकअपने कारला जोरदार धडक दिली.

  • अपघातात किशोर मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.

  • पत्नी योगिता मराठे गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

  • लग्न समारंभासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

  • पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

भूषण अहिरे, धुळे

धुळ्यातून दुःखदायक बातमी समोर आली आहे. शिरपूर तालुक्यात रविवारी सकाळी लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या कारला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व्यक्तीचे नाव किशोर हिलाल मराठे (वय ४५) असे असून त्यांची पत्नी योगिता मराठे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील विखरण येथील किशोर हिलाल मराठे आणि त्यांची पत्नी योगिता मराठे हे नंदुरबार येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी कारने जात होते. दरम्यान, वरुळ ते भामपूर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातानंतर पिकअप वाहन देखील रस्त्यावर पलटी झाली.

SHIRPUR ROAD ACCIDENT: HUSBAND KILLED, WIFE SERIOUSLY INJURED IN DHULE
Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

या भीषण अपघातात किशोर मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी योगिता मराठे यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

SHIRPUR ROAD ACCIDENT: HUSBAND KILLED, WIFE SERIOUSLY INJURED IN DHULE
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी करा

किशोर मराठे हे आपल्या कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. लग्न समारंभाच्या आनंदावर या अपघातामुळे दुःखाची छाया पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांनी वाहन चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com