Dharashiv : धाराशिव हादरले! माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला, घरावर सशस्त्र दरोडा

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोड्यात निवृत्त सैनिक झाले आहेत. दरोडेखोरांशी झुंज देताना गंभीर जखमी झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Dharashiv : धाराशिव हादरले! माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला, घरावर सशस्त्र दरोडा
DHARASHIV ROBBERY RETIRED ARMY SUBEDAR INJURED FIGHTING ROBBERSsaam tv
Published On
Summary
  • धाराशिवमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा

  • निवृत्त सैनिकाने चोरांशी दोन हात केले

  • दरोडेखोरांनी दागिने व रोकड लुटली

  • पोलिसांकडून तपास सुरू, आरोपींचा शोध

बालाजी सुरवसे, धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्री घडलेल्या धाडसी दरोड्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी एका माजी सैनिकाच्या घरावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यावेळी भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुभेदार विश्वनाथ मुरलीधर जगताप (वय ७०) यांनी दाखवलेल्या शौर्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरोडेखोरांशी दोन हात करताना ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जगताप हे आपल्या पत्नीसह कुंभेजा येथील शेतातील घरात वास्तव्यास आहेत. रविवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास परिसरात वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा घेऊन सहा सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर धाड टाकली. दरोडेखोरांनी घरात घुसून कपाट उपसले आणि मौल्यवान वस्तू चोरल्या. त्यांनी जगताप यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने देखील हिसकावून घेतले.

Dharashiv : धाराशिव हादरले! माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला, घरावर सशस्त्र दरोडा
Pune : पुण्यात चोरीचा थरार, तरुणाने थेट PMPML ची बस चोरून सुसाट पळवली; नेमकं काय घडलं?

दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच विश्वनाथ जगताप यांनी धाडसाने दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांने पाच ते सहा वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आरडाओरड्याने परिसरातील नागरिक जागे झाले आणि घटनास्थळी धाव घेतली.

Dharashiv : धाराशिव हादरले! माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला, घरावर सशस्त्र दरोडा
Shocking : मुलगी दिसायला सुंदर, वाईट नजर पडू नये म्हणून आई बापाने केलं लेकीचं टक्कल; गुन्हा दाखल

नागरिक जमा होत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. या दरोड्यात आरोपींनी अंदाजे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

Dharashiv : धाराशिव हादरले! माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला, घरावर सशस्त्र दरोडा
Crime News : संतापजनक! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला एकट्यात गाठलं; ९वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे निवृत्त सैनिकाने दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरत असताना, ग्रामीण भागातील सुरक्षेच्या प्रश्नांकडेही पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपींना अटक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com