Shocking : मुलगी दिसायला सुंदर, वाईट नजर पडू नये म्हणून आई बापाने केलं लेकीचं टक्कल; गुन्हा दाखल

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये १६ वर्षीय मुलीचे पालकांनी केस कापून टक्कल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच मुलीला घरात डांबून ठेवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Shocking : मुलगी दिसायला सुंदर, वाईट नजर पडू नये म्हणून आई बापाने केलं लेकीचं टक्कल; गुन्हा दाखल
Amravti NewsSaam Tv
Published On
Summary
  • अमरावतीतील वरूडमध्ये १६ वर्षीय मुलीवर पालकांकडून अत्याचार

  • मुलीचे केस कापून तिला घरात बंदिस्त ठेवले

  • मुलीने धैर्य दाखवत पोलिसांकडे तक्रार केली

  • पालकांविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू

अमर घटारे, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मुलीच्या सौंदर्यामुळे कोणी तिच्याकडे आकर्षित होऊ नये म्हणून जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या १६ वर्षीय मुलीचे केस पूर्णपणे कापून तिला घरात डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते आणि शिक्षण घेत आहे. एका तरुणाकडून मुलीचा पाठलाग होत असल्याचा संशय पालकांना होता. यासंदर्भात त्या तरुणाविरुद्ध तक्रार देण्यासाठी त्यांनी मुलीवर दबाव टाकला होता. सदर मुलगी दिसायला सुंदर असल्याने तिच्या सौंदर्यामुळे कोणीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहू नये, या भीतीतून पालकांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी घरातच ट्रिमरच्या साहाय्याने मुलीचे केस कापून टक्कल केले. एवढेच नव्हे, तर तिला मारहाण करून घरातच बंदिस्त ठेवल्याचेही समोर आले आहे.

Shocking : मुलगी दिसायला सुंदर, वाईट नजर पडू नये म्हणून आई बापाने केलं लेकीचं टक्कल; गुन्हा दाखल
Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने धैर्य दाखवत थेट वरूड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीसमोर मुलीने आपली कैफियत मांडल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आई-वडिलांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडित मुलीने पालकांसोबत राहण्यास नकार दिला आहे.

पुढील कार्यवाही सुरू असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी काळजीपोटी केलेले कृत्य असले, तरी त्याची पद्धत अत्यंत चुकीची असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध सुरू असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com