बालाजी सुरवसे
धाराशिव : कोरड्या विहीरीत पडल्याने शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनगिरी (Dharashiv) येथे घडली. घटनेच्या तिसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान परंडा पोलिसांनी मृतदेह (Death) क्रेनच्या साह्याने बाहेर काढला. (Tajya Batmya)
धाराशिवच्या सोनगिरी येथे घडलेल्या घटनेत अशोक गायकवाड असे मृत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. अशोक गायकवाड हा मुळ सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई येथील असुन सोनगिरी येथे सासरवाडीत मजुरीचे काम करीत होता. दरम्यान गायकवाड हे कामावर गेल्यानंतर ६ तारखेपासून ते घरी आले नसल्याने कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरु होता. मात्र ते घरी न आल्याने मुळ गावी गेले असतील असा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी बांधला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विहिरीजवळ चप्पल दिसल्याने घटना उघड
मात्र सोनगिरी येथील आंगत वेताळ हे ८ फेब्रुवारीला शेतात गेले असता शेताच्या कडेला चप्पल दिसल्याने विहीरीत डोकावून पाहीले. यावेळी त्यांना विहिरीत व्यक्ती पडलेला दिसून आला. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन ७० ते ८० फुट धोकादायक विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मात्र शेतमजुर विहीर कसा पडला याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.