Weather Alert: थंडी पळाली, तापमानात मोठी वाढ; राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कुठे कोसळणार पाऊस?

Rain Alert in Maharashtra: पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
Weather Forecast 9 February 2024 Rain Alert
Weather Forecast 9 February 2024 Rain AlertSaam TV
Published On

Maharashtra Weather Update

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झालंय. पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather Forecast 9 February 2024 Rain Alert
Breaking News: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

भारताच्या मैदानी भागात हवामानाचे स्वरूप बदलणार असून १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

कुठे कुठे कोसळणार पाऊस?

अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. महाराष्ट्रातील काही भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Heavy Rain) होऊ शकतो, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे येत्या शनिवारी आणि रविवारी(१० फेब्रुवारी- ११ फेब्रुवारी) ला ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या भागात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार (०९ फेब्रुवारी, १० फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी) पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पुण्यातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. पुढील चार ते पाच दिवसांत पुण्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Forecast 9 February 2024 Rain Alert
Daily Horoscope: 'या' ४ राशीच्या लोकांच्या सर्व अडचणी संपणार, तुमच्यासाठी कसा असेल शुक्रवार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com