Dharashiv : अन्नातून महिलांना विषबाधा, आमदारांसह भाजप नेत्यांची धाराशिव रुग्णालयात धाव

Dharashiv Latest Marathi News : दरम्यान विषबाधा कशामुळे झाली हे सर्वांचे रक्ताचे नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर समजू शकेल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
dharashiv hospital
dharashiv hospitalsaam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Dharashiv Food Poisioning News :

धाराशिव जिल्ह्यात पुरणपोळी खाल्ल्यानंतर ३० पेक्षा अधिक नागरीकांना विषबाधा झाल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना कळंब (kalamb) तालुक्यातील परतापुर (partapur) येथे घडली आहे. या घटनेनंतर काही महिलांना अधिक उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात आज (गुरुवार) दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील परतापुर येथे एका कुटुंबाने सुवासिनींसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे गाेडधाेड खाल्ल्यानंतर काही महिलांची सुमारे तीन तासांनंतर तब्येत बिघडली. त्यानंतर तातडीने नागरिकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.

dharashiv hospital
Bhandara : 21 लाखांचा घाेटाळा? देव्हाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरंपच, ग्रामसेवका विराेधात भंडारा झेडपीत सरपंचांची तक्रार

त्यानंतर आज (ता. ८) काही महिलांना धाराशिव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धाराशिवच्या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात ३० पेक्षा जास्त महिला न नागरिकांना दाखल करण्यात आले आहे. यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

dharashiv hospital
Valentine Day निमित्त मावळातून तीस लाख गुलाब जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, शेतकऱ्यांची लगबग सुरू

या रुग्णालयात आमदार कैलास पाटील (mla kailas patil) ,भाजपा नेते नितीन काळे (bjp leader nitin kale) यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच नेत्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना योग्य उपचार करण्याबाबत सूचना दिल्या.

दरम्यान विषबाधा कशामुळे झाली हे सर्वांचे रक्ताचे नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर समजू शकेल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

dharashiv hospital
Asha Sevika Morcha : ऑनलाईन कामाची सक्ती अमान्य, अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com