Organic Farming : सेंद्रिय पद्धतीने चिकूचे उत्पादन; खर्च जाऊन वर्षाला लाखोचे उत्पन्न

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील धानोरा येथील यशवंतराव कुऱ्हाडे यांनी आपल्या २ एकर शेतात सेंद्रिय पद्धतीने चिक्कूची लागवड केली आहे.
Organic Farming
Organic FarmingSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : कोणत्याही खताशिवाय व कीटकनाशक न वापरता सेंद्रिय शेती करण्याचा अवलंब अनेक शेतकरी (Farmer) करत आहेत. अशाच प्रकारे सेंद्रिय पद्धतीने गावरान चिकूची लागवड केली आहे. यातून लाखोंचे उत्पन्न शेतकरी घेत आहे. (Nanded) या चिकूला मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. (Latest Marathi News)

Organic Farming
Weather Alert: थंडी पळाली, तापमानात मोठी वाढ; राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कुठे कोसळणार पाऊस?

नांदेड जिल्ह्यातील धानोरा येथील यशवंतराव कुऱ्हाडे यांनी आपल्या २ एकर शेतात सेंद्रिय पद्धतीने चिक्कूची लागवड केली आहे. त्यातून त्यांना वर्षाकाठी खर्च वगळता एक लाखांचे उत्पन्न मिळत आहे. २००६ साली कुऱ्हाडे यांनी या चिक्कूची लागवड केली. कोणत्याही खताचा वापर ते करीत नाहीत. यातून चिकूचे (Organic Farming) चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत असून या चिकूला बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Organic Farming
Cotton Price : कापसाचे दर स्थिरावले; भाववाढीच्या अपेक्षेने अजूनही कापूस घरात

गूळ, हळद, लिंबोणी अर्काची फवारणी 

मुख्य म्हणजे कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी देखील कुऱ्हाडे करत नाही. शेणखत, वेळेवर पाणी आणि फुलं टिकवण्यासाठी घरगुती गुळ, हळद, लिंबोणीच्या पाल्याचा अर्क यापासून औषध तयार करून एक वेळ फवारणी केली जाते. इतर शेतकऱ्यांनीही अशीच फळबाग शेती करून चांगले उत्पन्न मिळवावे असं आवाहनही यशवंतराव कुऱ्हाडे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com