Cotton Price : कापसाचे दर स्थिरावले; भाववाढीच्या अपेक्षेने अजूनही कापूस घरात

Akola News : कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला नव्हता. मात्र दर साडेसात हजाराच्या वर न गेल्याने नाईलाजास्तव कापूस विक्रीस काढावा लागत आहे.
Cotton Price
Cotton PriceSaam tv
Published On

अक्षय गवळी 
अकोला
: कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे. कारण कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत (Akola) असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून पाहण्यास मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कापूस (Cotton) दर स्थिरावले आहे. तरी देखील कापसाचे हे दर शेतकऱ्यांसाठी कमी आहेत. (Tajya Batmya)

Cotton Price
Chhatrapati Sambhajinagar Accident: परीक्षेला जाताना डंपरने चिरडलं, तिघे बहिण- भाऊ जागीच ठार; काळीज पिळवटून टाकणारी घटना

कापसाचे दर (Cotton Price) वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला नव्हता. मात्र दर साडेसात हजाराच्या वर न गेल्याने नाईलाजास्तव कापूस विक्रीस काढावा लागत आहे. यात व्यापारी हमीभावापेक्षा कापसाला कमी दर देत असल्याने (Farmer) शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सद्यस्थितीत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान भाव ६ हजार ७०० पासून कमाल भाव ७ हजार १९५ रूपये आहे. तोच मागील महिन्यात ९ जानेवारीचा ६ हजार ८५० पासून ७ हजार २५० रूपयांपर्यत क्विंटलमागे भाव होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cotton Price
Kalyan Crime : सराईत चैन स्नेचरला अटक; कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई

शेतकऱ्यांना अजूनही भाववाढीची अपेक्षा 

इतकेच नव्हे तर आता कापसाची आवक अतिशय कमी झाली आहे. मात्र अजूनही भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला शेतातून काढलेला कापूस घरातच साठवून ठेवणं पसंत केलं आहे. हीच परिस्थिती अन्य परिसरतही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com