Saam Impact : शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका; केंद्रावर लिलाव करण्यास बंदी

Nandurbar News : शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना कापूस खरेदी केंद्रावर लिलाव करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने नोटीस देखील बजावण्यात आली
Saam Impact
Saam ImpactSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केली जात होती. याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार (Shahada) शहादा शहरातील कापूस खरेदी केंद्रावर घडला होता. (Cotton) या प्रकारची बातमी 'साम टीव्ही'ने प्रसारित केली. या बातमीची दखल घेत बाजार समितीने व्यापाऱ्याला दणका दिला आहे. (Live Marathi News)

Saam Impact
Akola Zilha Parishad : १३ काेटी ४९ लाखांची कामे रखडले; जिल्हा परिषद सदस्यांचे डीपीओ कक्षात ठिय्या

शहादा येथील कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना (farmer) केले जाणारे मारहाणीची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. बातमी सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने (Bajar Samiti) त्याची दखल घेतली असून शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना कापूस खरेदी केंद्रावर लिलाव करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने नोटीस देखील बजावण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Saam Impact
Jal Jeevan Mission : 'हर घर जल' योजनेपासून ५०५ गावे अजून दूरच; धुळे जिल्ह्यात ९८ टक्के जोडणी

आता हमीभावाने खरेदी 

साम टीव्हीच्या बातमीनंतर व्यापारांच्या मनमानी कारभार बंद झाला असून शासनाचा हमीभावाप्रमाणे कापसाची खरेदी करण्यास सुरुवात झाली. शासनाचा हमीभावाप्रमाणे कापसाला दर मिळत असल्याने ५० ते ६० ट्रॅक्टरमधून शेतकरी आपला कापूस खरेदी करण्यासाठी शहादा शहरातील कापूस खरेदी केंद्रावर आणत आहे. शासनाचा हमीभावाप्रमाणे कापूस खरेदी केला जात असून शेतकऱ्यांनी साम टीव्हीचे आभार मानले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com