हिंगोली : कापसाला यंदा अपेक्षित दर मिळाले नाही. एकीकडे शासनाने कापसाचा हमीभाव ठरवून दिला. तर दुसरीकडे खाजगी व्यापाऱ्यांकडून तर (Farmer) शेतकऱ्यांची लूटच सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Tajya Batmya)
राज्यभरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट सुरूच आहे. सरकारकडून शेतकऱ्यांचा कापूस हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील (Hingoli) हिंगोलीमध्ये खाजगी कापूस जिनिंग धारकांकडून तीनशे ते चारशे रुपये स्वस्त दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू आहे. असे असताना (Cotton Price) देखील शासनाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई झालेली नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गुणवत्तेचे दिले जाते कारण
शासनाने कापसाला हमीभाव निश्चित केला आहे. असे असताना व्यापारी अगोदर शेतकऱ्याच्या घरात असलेल्या कापसाची पाहणी करतो व यानंतर त्याचा भाव ठरवत असतो. अर्थात मालाची गुणवत्ता योग्य नसल्याचे कारण देत बळीराजाला आर्थिक भुर्दंड लावत ही लूट सुरू असून, बाजार समिती प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.