
बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्याने एका मुस्लीम कुटुंबाला मारहाण केल्याची घटना धाराशिवमधून समोर आली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीने आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण केले आहे. मारहाण प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील रहिवाशी पाशा शेख यांनी कुटुंबाला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्याने आम्हाला मारहाण झाली असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकदिवसीय आमरण उपोषण केले आहे.
'आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गणेशौत्सव असे अनेक हिंदू सण साजरे करतो. आमच्या घराच्या परिसरात जातीयवादी लोक आहेत. त्यांनी तुम्ही हिंदू सण का साजरे करता, भगवे झेंडे का लावता असे म्हणत माझ्या मुलाशी दोन ते तीन वाद घातला होता. या लोकांनी माझ्या मुलाला मारहाण केली. १६ मार्च रोजी त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. त्यानंतर या लोकांनी माझ्या पत्नीला आणि मुलीला मारहाण केली', असे वक्तव्य पाशा शेख यांनी केले.
या लोकांनी आम्हाला मारहाण केली. त्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पण पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत नसल्याचा आरोप पाशा शेख यांनी केला आहे. महाराज तुम्हीच न्याय द्या, असे म्हणत त्यांनी कुटुंबीयांसोबत धाराशिवमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकदिवसीय आमरण उपोषण केल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.