Pune Swargate Case Update : शिवशाही बसमध्ये रिक्रिएट केली अत्याचाराची घटना; पीडितेने आरडाओरड केली होती का? सत्य आलं समोर

Swargate ST Bus Depot Case : पुण्यातील स्वारगेट बस डेपो प्रकरणातील नवी अपडेट समोर आली आहे. घटनेच्या वेळी पीडितेने आरडाओरड केली होती की नाही यासाठी पोलिसांनी बसमध्ये पडताळणी केली आहे.
Pune Swargate Case Update
Pune Swargate Case UpdateSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडे कोठडीत असताना पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडित तरुणीने आरोपीला प्रतिकार केला होता, मात्र बस वातानुकूित असल्याने तरुणीचा आवाज बाहेर गेला नसल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

स्वारगेट बस डेपोच्या परिसरात २५ फेब्रुवारी रोजी २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. ज्या वेळेस ही घटना घडली, तेव्हा तरुणीने आरडाओरडा का केला नाही? तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बसमधून आवाज बाहेर येतो किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली.

Pune Swargate Case Update
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी बसमध्ये प्रत्यक्ष ध्वनी प्रयोग केला होता. पोलिसांसह ध्वनी तंत्रज्ञांना घेऊन स्वारगेट एस टी बसमध्ये जाऊन पंचनामा करण्यात आला. यातून तरुणीने आरोपीला प्रतिकार केला होता. आरडाओरडा करत मदत मिळवण्यासाठी पीडिता प्रयत्न करत होती. पण बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या. या काचांमुळे आवाज बाहेर गेला नाही.

Pune Swargate Case Update
Surekha Punekar: महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार? सुरेखा पुणेकरांनी थेट VIDEO च दाखवला

बस डेपो प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात भक्कम पुरावे मिळावे यासाठी पोलिसांनी ही ध्वनी यंत्र पडताळणी केली आहे. यातून बसमधून आवाज बाहेर गेला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या माहितीचा वापर या गंभीर प्रकरणात होईल असा पोलिसांना विश्वास आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे येरवडा कारागृहात आहे.

Pune Swargate Case Update
Parbhani News: सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येला गृहमंत्रीच जबाबदार, पोलिसांनी खोटी माहिती दिली; ठाकरे गटाचे खासदार कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com