Surekha Punekar: महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार? सुरेखा पुणेकरांनी थेट VIDEO च दाखवला

Cultural Centers or Dance Bars? राज्यातील सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरेखा पुणेकर यांनी याचे व्हिडीओ दाखवले. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा प्रकार समोर आणला.
Surekha Punekar:  महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार? सुरेखा पुणेकरांनी थेट VIDEO च दाखवला
Viral Video Saam Tv
Published On

राज्यात डान्स बारवर बंदी असताना देखील सर्रासपणे खुलेआम अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार आणि डीजे सुरु असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. सुरेखा पुणेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. यावेळी सुरेखा पुणेकर यांनी सांस्कृतिक कला केंद्रामध्ये सुरू असलेल्या धिंगाण्याचे धक्कादायक व्हिडीओच दाखवले.

सुरेखा पुणेकर यांनी थेट राज्यातील ८२ पैकी ४२ कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु असल्याचा दावा केला. पत्रकार परिषदेत सुरेखा पुणेकर यांनी थेट धक्कादायक व्हिडीओ दाखवले. या डान्स बारवर तत्काळ बंदी आली पाहिजे. यामुळे अनेक संगीतकार, कलाकार, वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.

Surekha Punekar:  महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार? सुरेखा पुणेकरांनी थेट VIDEO च दाखवला
Mumbai Pune: मुंबई - पुण्याचा प्रवास होणार सुसाट, अवघ्या २५ मिनीटात गाठाल पुणे; बुलेट ट्रेनलाही टाकेल मागे

सुरेखा पुणेकर यांनी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ३ ते ४ महिला साडी नेसून डान्स करत आहेत. डीजेच्या तालावर या महिला डान्स करत असून काही तरुण त्यांच्यावर पैसे उधळत आहे. यावेळी तरुण अश्लिल चाळे करताना दिसत आहे.' सुरेखा पुणेकर यांनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Surekha Punekar:  महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार? सुरेखा पुणेकरांनी थेट VIDEO च दाखवला
Pune Cyber Police : कंपनीचा एमडी असल्याचे सांगत अकाउंटंटला गंडविले; काही तासातच ४० लाख मिळाले परत

महाराष्ट्रामध्ये लोकनाट्य कला केंद्र ६२ आहेत. या कलाकेंद्रांना लायसन्स दिले आहेत. यामधील २० कला केंद्रांना नियमावली लायसन्स दिले आहे. यानुसारच पेटी, तबला, ढोलकी, घुंगरू, नृत्यांगना आणि सोंगाड्या, गायिका या कलाकेंद्रामध्ये चालू आहेत. राज्यातील ३८ कला केंद्रामध्ये डीजे सुरू आहे. ज्या पार्ट्यांना शासनाने नियमावली लायसन्स असेल तरच त्या पार्ट्यांना कला केंद्रांमध्ये प्रवेश दिला जातो.

Surekha Punekar:  महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार? सुरेखा पुणेकरांनी थेट VIDEO च दाखवला
Pune Crime: कोंढव्यात पार्किंगचा वाद! भररस्त्यात तरुणांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर धारधार शस्त्रांनी वार

या कलाकेंद्रासाठी असणाऱ्या नियमांमध्ये असे देखील नमूद करण्यात आले आहे की, स्टेज परफॉरमन्स करताना कलाकारांची वेशभुषा कशी असावी. नृत्यांगना आणि गायिका नऊवारी साडीमध्ये असावी. गण -गवळण पारंपारिक लावणी आणि घुंगरू पेटी, तबला ढोकली अशी वेशभुषा असावी. नृत्यांगनाचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. अशाच नृत्यांगनाना पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो.

Surekha Punekar:  महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार? सुरेखा पुणेकरांनी थेट VIDEO च दाखवला
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात वाढ; वाहनधारकांच्या खिशाला फटका; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com