Pune Cyber Police : कंपनीचा एमडी असल्याचे सांगत अकाउंटंटला गंडविले; काही तासातच ४० लाख मिळाले परत

Pune News : पुण्यातील कंपनीच्या अकाउंटंटना सायबर चोरट्यांनी तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घातला. फिर्यादी यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी देखील या तक्रारीची गंभीर दखल
Pune Cyber Police
Pune Cyber PoliceSaam tv
Published On

अक्षय बडवे 
पुणे
: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या कारणांनी फसवणूक केली जात असते. त्यानुसार पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या अकाउंटंटची फसवणूक करत ४० लाख गंडविले. दरम्यान पुण्याच्या सायबर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच सायबर चोरटयांनी गंडविलेली ४० लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात यश मिळाले आहे. 

पुण्यातील एका कंपनीतील अकाऊंटंटला अनोळखी व्यक्तींने व्हॉटसअँप मॅसेज केला. सायबर चोरट्यांनी कंपनीचे एम.डी. बोलत असल्याचे भासवले. एका मीटींगमध्ये आहे व हा माझा पर्सनल मोबाईल क्रमांक आहे मी सांगतो म्हणून आपल्या बँकेच्या खात्यातून ४० लाख मी सांगतो त्या अकाउंट वर पाठवा असे सांगून चोरट्यांनी त्या अकाउंटंट यांचा विश्वास संपादित केला. अकाउंटंट यांनी ते पैसे पाठवले. 

Pune Cyber Police
Women Group Farming : महिलांची गट शेतीतून क्रांती; ट्रॅक्टरने सगळी कामे करतात महिला, बीडच्या देवळा गावचा आदर्श

सायबर पोलिसांकडून लागलीच दखल 

हा सगळा प्रकार १ फेब्रुवारीला घडला होता. पुण्यातील कंपनीच्या अकाउंटंटना सायबर चोरट्यांनी तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घातला. फिर्यादी यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी देखील या तक्रारीची गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली. एनसीआरबी या संकेतस्थळावर जाऊन सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सर्व माहिती अपडेट करून संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली.

Pune Cyber Police
Shiv Bhojan Thali : शिवभोजन केंद्रातील जेवणात आढळल्या अळ्या; खामगाव शहरातील धक्कादायक प्रकार

अशा प्रकारे वाचविली रक्कम 

पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन परराज्यातील बँक खात्याबाबत पत्रव्यवहार करून तसेच बँक खाते हे परराज्यातील असल्याचे दिसले. यानंतर तेथील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन पाठपुरावा करून त्यांचे मदतीने फसवणुक झालेली रक्कम अवघ्या काही तासात गोठवली. रक्कम गोठवल्यामुळे सायबर चोरट्यांना ते पैसे मिळाले नाहीत आणि फिर्यादी यांना ते पैसे परत मिळाले.

कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून जर कुठला आमिष दाखवण्याचा मेसेज आला तर त्याला कुठलेही उत्तर देऊ नका तसेच तुमच्या बँकेची खाजगी माहिती कोणालाही फोनवर देऊ नका. श्री सायबर पसंत झाली असेल तर त्वरित पुणे सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधा असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com