
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद न्यायालयाने एक टिप्पणी केली आहे. पीडितेच्या स्तनांना स्पर्श करणे किंवा तिच्या पायजम्याची नाडी तोडणे हा बलात्काराचा गुन्हा मानला जाऊ शकत नाही. पण याला निश्चितच लैंगिक छळ म्हटले जाईल, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राम मनोहर मिश्रा यांनी केली. कासगंजच्या पटियाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही टिप्पणी केली आहे. यात त्यांनी आकाश आणि इतर दोन आरोपींची फौजदारी पुनर्विचार याचिका स्वीकारली आहे. बलात्काराचा प्रयत्न आणि गुन्ह्याची तयारी यातील फरक समजून घेतला पाहिजे, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे पवन आणि आकाश या दोन आरोपींना ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झाली होती. पीडित मुलीच्या छातीला स्पर्श केला आणि तिच्या पायजम्याची नाडी ओढली; तसेच मुलीला ओढून पुलाखाली नेले होते. तिथं नेल्यानंतर काही लोकांनी बघितलं. परिसरातील काही लोकांनी त्यांना हटकले. तेथून दोघांनी पळ काढला.
या प्रकरणानंतर आरोपी पवन आणि आकाशवर कलम ३७६ नुसार बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी कासगंज सत्र न्यायालयात झाली होती. नंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग केलं होतं. अलाहाबाद उच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी गेल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींवर कलम ३५४- ब आयपीसी आणि पोक्सो कायद्याच्या कलम ९/१० अंतर्गत खटला चालवण्याचे निर्देश दिले.
एकलपीठाचे न्यायाधीश म्हणाले, 'आरोपी पवन आणि आकाश यांच्यावरील आरोप आणि प्रकरणातील तथ्ये बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरत नाही. आरोपी पवन आणि आकाश यांनी ११ वर्षांच्या पीडितेच्या स्तनांना स्पर्श करणे आणि पायजम्याची नाडी ओढण्याचा प्रयत्न केला. तिला पुलाखाली नेलं. परंतु, परिसरातील लोकांनी त्यांना हटकले. त्यामुळे आरोपींनी तिथून पळ काढला. त्यांनी बलात्काराचा गुन्हा केला नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.