Nagpur Clash: नागपूर हिंसाचाराआधी नेमकं काय घडलं? जमावाची माथी कशी भडकली, धक्कादायक VIDEO समोर

Nagpur curfew updates: नागपुरातील हिंसाचाराआधी नेमकं काय घडलं? कुणी जमावाची भडकवली? दंगली आधीचा व्हिडिओ समोर. दुकाने आणि वाहनांचे कसे नुकसान केले पाहा.
nagpur
nagpurSaam
Published On

नागपुरातील महालमधील दंगलीचा सुत्रधार फहीम खान याच्यासह इतर दंगलखोरांविरोधात सायबर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४ गुन्हे दाखल केले आहेत. या दंगलीचा बांगलादेशी कनेक्शनही समोर आलं आहे. दंगलीचे व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. पण आता दंगलीच्या आधीचेही व्हिडिओही व्हायरल होत आहे.

नागपूर दंगलीच्या आधीचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये काही तरूण शिवाजी पुतळ्याकडे पाहत असल्याचं दिसत आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढील तपास पोलीस करणार आहेत. या दंगलीमागे आणखी कुणाचा हात होता का? याचाही शोध सुरू आहे.

nagpur
Shocking Crime: "आज नको ना.."बेडवर बायकोने संबंध ठेवण्यास दिला नकार, नवऱ्याची सटकली थेट जीवच घेतला

फहीम खान देशद्रोही

दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खानची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. फहीम खानच्या वादग्रस्त भाषणानंतर ही दंगल भडकली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

जमावाने मिळून काही घरं, दुकाने आणि वाहनांना पेटवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांवरही हल्ला केला. या प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

nagpur
Disha Salian: 'फोन कॉल तपासा, सत्य बाहेर येऊ द्या', दिशा सालियान प्रकरणी नरेश म्हस्के काय म्हणाले?

नागपुरात कर्फ्यू कायम

नागपूर शहरातील सहा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागांमधील कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. २ तासांची शिथिलता रद्द करण्यात आली आहे. या ठिकाणी पूर्ण वेळ संचारबंदी असणार आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

नागपुरात हिंसाचार झाल्यानंतर एकूण ११ पोलीस ठाणे हद्दीत कर्फ्यू आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यापैकी दोन पोलीस स्टेशन हद्दीतील कर्फ्यू २० मार्चला उठवण्यात आला होता. तर तीन पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे.

गणेशपेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com