

पक्ष फुटीवर ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया
राजकीयरित्या बरोबर निर्णय असल्याचा निंबाळकर यांचा दावा
निंबाळकर यांच्या विधानाने चर्चांना उधाण
बालाजी सुरवसे, साम टीव्ही
खासदार ओमराजे निंबाळकर मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्यासहित ६ खासदारांनी बंडखोरी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सोशल मीडियावरही ओमराजे निंबाळकर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. मी धर्म संकटात आहे. इमोशनली विचार केला तर पाऊल चुकीचे वाटतंय. पॉलिटिकल विचार केला तर तेच बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखत दिली. यावेळी निंबाळकर यांनी ठाकरे गटाच्या पक्षफुटीवर भाष्य केलं. त्यांनी घेतलेल्या निर्णयावरही निंबाळकरांनी भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटात राहिल्यास राजकीय अस्तित्व धोक्यात असण्यावर भाष्य करताना निंबाळकर म्हणाले, 'खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते'.
'मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नाही. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नाही, असं भाष्य निंबाळकर यांनी विकासकामांसाठी निधी व सत्तेचा अभावावर भाष्य करताना दिलं.
शिंदे सेनेत प्रवेश कधी?
ओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर भाष्य करताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, 'शिंदेसेनेत प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. मात्र वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे'. पैसे घेतल्याचा चर्चेचा इन्कार करताना निंबाळकरांनी म्हटलं की, पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी घेतलाय'.
ओमराजे यांनी ठाकरे नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करताना म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात. मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणामुळे फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.