'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

Dhananjay Deshmukh Serious Allegation On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी गाडी अडवून हवेत दोन राऊंड गोळीबार केला असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी हा आरोप केलाय.
Dhananjay Deshmukh Serious Allegation On Dhananjay Munde
Dhananjay Deshmukh addresses the media after making serious allegations against Dhananjay Munde, sparking a fresh political storm in Beed.
Published On
Summary
  • धनंजय मुंडे गाडी अडवून हवेत गोळीबार केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय.

  • धनंजय मुंडे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • या आरोपांमुळे बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

'मला गाडी आडवी लावून धनंजय मुंडे यांनी हवेत दोन राऊंड फायर केले', असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. धनंजय देशमुखांच्याआरोपाने खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर धमकीचा आरोप करण्यात आला होता. धनंजय देशमुख यांच्या साडूच्या भावाला पिस्टल लावून धनंजय देशमुखांनी धमकावले होते. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Dhananjay Deshmukh Serious Allegation On Dhananjay Munde
Shocking : गर्लफ्रेंडनं शरीरसंबंध ठेवले, नंतर बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला; धक्कादायक कारण उघड

याप्रकरणी धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अशी कुठलीही घटना घडली नाही, असे आम्ही पोलिसांना सांगत होतो, गुन्हा दाखल करण्यापूर्वी शहानिशा करा, असं सांगत होतो मात्र पोलिसांनी माझ्याविरुद्ध 48 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यावरून थेट 307 चा गुन्हा दाखल केला.मात्र माझ्यासोबत देखील, अशीच घटना घडली होती. धनंजय मुंडे यांनी मला गाडी आडवी लावली आणि हवेत दोन फायर केले, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केली. या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करावा असं धनंजय देशमुख म्हणालेत.

Dhananjay Deshmukh Serious Allegation On Dhananjay Munde
नवविवाहित सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा संशयास्पद मृत्यू,नवऱ्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

यानंतर आयपीएस दर्जाचे अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि धनंजय देशमुख यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात तब्बल सात तास चौकशी केली आणि तपास केला. सीसीटीव्ही आणि काही लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर अशी घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर धनंजय देशमुख यांच्याविरुद्धचा गुन्हा खोटा असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. पुढे धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, धनंजय देशमुख यांनी केलेली तक्रार हास्यास्पद आहे. या भांडणात आमचे नेते धनंजय मुंडे यांची बदनामी झाली आणि याचा खुलासा २४ तासात पोलीस विभागाने द्यावा. याकरिता मुंडेंच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून मागण्याचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले. याबाबतची तक्रार धनंजय देशमुख यांनी दिली असेल तर त्याचा खुलासा पोलीस विभागाने करावा असे म्हणणे मुंडे समर्थक भागवत तावरे यांनी मांडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com