Shocking : गर्लफ्रेंडनं शरीरसंबंध ठेवले, नंतर बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला; धक्कादायक कारण उघड

Rajsthan Crime News : राजस्थानमध्ये बॉयफ्रेंडने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याच्या रागातून तरुणीने त्याच्यावर ब्लेडने हल्ला करून प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून तपास केला जात आहे.
JAIPUR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY CUTS BOYFRIEND'S PRIVATE PART OVER MARRIAGE DISPUTE
JAIPUR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY CUTS BOYFRIEND'S PRIVATE PART OVER MARRIAGE DISPUTESaam Tv
Published On
Summary
  • राजस्थानच्या जयपूरमधील धक्कादायक घटना

  • गर्लफ्रेंडने कापला बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट

  • बॉयफ्रेंडने दुसरे लग्न केल्याच्या रागातून हल्ला केला

  • जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Rajasthan Jaipur Girlfriend Cut Boyfriend Private Part राजस्थानची राजधानी जयपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने संतापाच्या भरात आपल्या बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला असल्याची घटना घडली आहे. बॉयफ्रेंडने दुसरं लग्न केल्याच्या रागातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचलले असल्याचे उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर संबंधित पीडित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुण निखिल (बदलेल नाव) आणि संबंधित महिला (बदलेल नाव रुचिता ) गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्या निखिलने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचे रुचिताला समजले. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच व्यक्तीने धोका दिल्याने रुचिता संतापली. संतापाच्या भरात तिने निखिलला भेटायला बोलावलं. शनिवारी निखिल रुचिताच्या घरी तिला भेटायला.यादरम्यान त्याने रुचितासोबत शारीरिक संबंध ठेवले.

JAIPUR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY CUTS BOYFRIEND'S PRIVATE PART OVER MARRIAGE DISPUTE
Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

मात्र आपली फसवणूक झाली आहे आणि निखिल आपल्याला वारंवार खोटं बोलत असल्याचा राग रुचिताच्या मनात खदखदत होता. याच रागातून रुचिताने जवळच असलेलं ब्लेड उचललं आणि निखिलच्या प्रायव्हेट पार्ट कापला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

JAIPUR SHOCKER: WOMAN ALLEGEDLY CUTS BOYFRIEND'S PRIVATE PART OVER MARRIAGE DISPUTE
Petrol Diesel : केंद्र सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपात; १ जूनपासून नवे नियम लागू

दुसरीकडे, महिलेने पोलिसांना सांगितले की, प्रियकराने तिची फसवणूक करून दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. तसेच तो तिच्या घरी आल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी त्याने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोपही तिने केला आहे. तसेच वादादरम्यान त्या तरुणाने स्वतःच्या मानेवर ब्लेडने वार केला आणि नंतर तिच्या मनगटावर हल्ला केला. रक्तस्राव सुरू झाल्यानंतर त्यानेच तिला ब्लेड देऊन स्वतःचे गुप्तांग कापण्यास सांगितल्याचा दावा तिने केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. जखमी तरुणाचा जबाब नोंदवण्यात आला असून संबंधित महिलेचीही चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com