Petrol Diesel : केंद्र सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपात; १ जूनपासून नवे नियम लागू

Petrol Diesel Export Duty Cut News : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरील निर्यात शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
PETROL, DIESEL AND ATF EXPORT DUTY CUT FROM JUNE 1; RETAIL FUEL PRICES TO REMAIN UNCHANGED
PETROL, DIESEL AND ATF EXPORT DUTY CUT FROM JUNE 1; RETAIL FUEL PRICES TO REMAIN UNCHANGEDgoogle
Published On
Summary
  • केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरील निर्यात शुल्कात मोठी कपात जाहीर केली

  • पेट्रोलवर १.५ रुपये, डिझेलवर १३.५० रुपये आणि एटीएफवर ९.५० रुपये प्रति लिटर शुल्क कमी करण्यात आले

  • १ जून २०२६ पासून नवीन शुल्क दर लागू होणार

  • निर्यात शुल्क कपातीमुळे तेल कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता

Petrol Diesel And ATF Export Tax Reduce केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF ) यांच्या निर्यातीवर लावण्यात आलेल्या विशेष शुल्कात मोठी कपात करण्यात येणार आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर १.५ रुपये प्रति लीटर, तर डिझेलच्या निर्यातीवर १३.५० रुपये प्रति लीटर कपात, एटीएफ निर्यातीवरील करात ९.५० रुपये प्रति लिटर इतकी घट करण्यात आली आहे. १ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.

सरकारने केवळ निर्यात शुल्कात कपात केली असून देशांतर्गत विक्रीवरील कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे देशातील ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तातडीने कोणताही दिलासा मिळणार नाही. पेट्रोल-डिझेलचे किरकोळ दर आहे तसेच राहणार आहेत.

PETROL, DIESEL AND ATF EXPORT DUTY CUT FROM JUNE 1; RETAIL FUEL PRICES TO REMAIN UNCHANGED
Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा यासाठी केंद्र सरकारने २७ मार्च २०२६ रोजी विशेष कर लागू केला होता. त्यानंतर परिस्थितीनुसार शुल्क दरांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. सरकारने या कररचनेत शेवटचा बदल १६ मे २०२६ रोजी केला होता. दरम्यान, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याआधी २५ मे रोजी इंधन दरांमध्ये वाढ करण्यात आली होती.

PETROL, DIESEL AND ATF EXPORT DUTY CUT FROM JUNE 1; RETAIL FUEL PRICES TO REMAIN UNCHANGED
Mumbai : रोटीवरच थुंकला कुक, मुंबईतील नामंकित हॉटेलमधील धक्कादायक घटना, Video व्हायरल

सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Price) , तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सुमारे ७ ते ८ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर ११० रुपयांच्या पुढे गेले आहेत. (Petrol Rate Update) अशा परिस्थितीत निर्यात दरातील कपातीचा निर्णय तेल कंपन्यांसाठी सकारात्मक मानला जात असला, तरी सामान्य ग्राहकांना इंधन दरांबाबत अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com