Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
MUMBAI RAINS BRING RELIEF FROM HEATWAVE; IMD ISSUES YELLOW ALERT, LOCAL TRAINS DELAYED
MUMBAI RAINS BRING RELIEF FROM HEATWAVE; IMD ISSUES YELLOW ALERT, LOCAL TRAINS DELAYEDSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईसह पालघरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

  • हवामान विभागाकडून मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी

  • विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० किमी वेगाने वाऱ्यांचा इशारा

  • पावसामुळे मुंबई लोकल सेवा सुमारे २५ मिनिटे उशिराने धावत आहे

  • पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता

Mumbai Rain Alert Today News राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० शी पार होता. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. अशातच रविवारची सकाळ नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून अनेक मुंबईसह अनेक शहरात पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी मान्सूनपूर्व पावसाने मुंबईची लोकल विस्कळीत झाली. दरम्यान आज मुंबई शहरासह पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

MUMBAI RAINS BRING RELIEF FROM HEATWAVE; IMD ISSUES YELLOW ALERT, LOCAL TRAINS DELAYED
Monsoon Rain Update : राज्यात किती टक्के पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

MUMBAI RAINS BRING RELIEF FROM HEATWAVE; IMD ISSUES YELLOW ALERT, LOCAL TRAINS DELAYED
New Mom Tips : प्रेग्नेंसीनंतर महिलांनी ब्रा वापरावी का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत रविवारपासून पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे (Palgahar Thane Rain Alert) जिल्ह्यांसाठीही सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (Kokan Rain Alert ) जिल्ह्यांमध्ये सोमवार आणि मंगळवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

MUMBAI RAINS BRING RELIEF FROM HEATWAVE; IMD ISSUES YELLOW ALERT, LOCAL TRAINS DELAYED
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

रविवारी सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडले असताना अचानक झालेल्या पावसामुळे त्यांची धावपळ उडाली. मात्र मान्सूनपूर्व पावसाने मुंबईची उपनगरीय रेल्वे २५ मिनिटे उशिराने धावत आहे. (Local Train Delayed Today ) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या उशिरा असल्याने असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तथापि, पावसाचा जोर वाढल्यास वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com