Alisha Khedekar
प्रेग्नेंसीनंतर ब्रेस्टच्या आकारात बदल होतात. त्यामुळे योग्य मापाची, आरामदायक आणि ब्रेस्टना सपोर्ट देणारी ब्रा निवडणे महत्त्वाचे आहे.
योग्य ब्रा ब्रेस्टचा जडपणा कमी करते आणि दैनंदिन कामे करताना अधिक आरामदायक वाटण्यास मदत करते
प्रेग्नेंसीनंतर ब्रेस्टच्या वाढलेल्या वजनामुळे पाठ आणि खांद्यांवर ताण येतो. चांगली ब्रा हा ताण कमी करण्यास मदत करते.
नर्सिंग ब्रा वापरल्यास बाळाला दूध देणे सोपे होते आणि आईलाही अधिक सोयीस्कर वाटते.
खूप घट्ट ब्रा घातल्याने स्तनांवर दाब येऊ शकतो, ज्यामुळे वेदना किंवा दूध वाहण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
प्रसूतीनंतर ब्रेस्टचा आकार वारंवार बदलू शकतो. त्यामुळे वेळोवेळी ब्राचा साईज तपासणे आवश्यक आहे.
ब्रेस्टमध्ये वेदना, सूज किंवा लालसरपणा दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरज असल्यास रात्री हलकी आणि वायर नसलेली ब्रा वापरावी, ज्यामुळे झोपताना आराम मिळतो.