Devendra Fadnavis: शेतकऱ्यांचा आत्महत्येंचा कलंक कसा पुसता येईल? देवेंद्र फडणवीसांनी PM मोदींच्या उपस्थितीत सांगितला मार्ग

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यातील पाण्याचा प्रश्न मांडला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On: 

Devendra Fadnavis News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरच्या शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिर्डी दौऱ्यात निळवडे धरणाचं लोकार्पण केलं. या लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यातील पाण्याचा प्रश्न मांडला. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते नरेंद्रजी मोदी यांचे स्वागत करतो. प्रधानमंत्री यांनी 2017 साली साई भूमीत विकास कामांचे भूमीपूजन केलं होतं. त्या सगळ्या कामांचं उद्घाटन देखील मोदी यांच्या हातूनच होते आहे'.  (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

'माझ्या जन्मापूर्वी निळवंडे धरणाचे काम सुरू झाले होते. इतक्या वर्षानंतर हे काम आपल्या हातून पूर्ण होतंय हे महत्वाचे आहे. विखे पाटील आणि मधुकर पिचड विरोधक असताना देखील त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Narendra Modi Speech: २०१४ पूर्वी आकडे फक्त भ्रष्टाचाराचे होते; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

'नमो किसान सन्मान योजनेचा आज मोदींजींच्या हस्तेच उद्घाटन झालं. महाराष्ट्राचा 50 टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. या भागांमध्ये जोपर्यंत आम्ही पाणी पोहचवू शकत नाही, तोपर्यंत इथल्या आत्महत्यांचे कलंक आम्ही पुसू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

Devendra Fadnavis
PM Narendra Modi: PM मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचं लोकार्पण;४६ वर्षांपासूनचा १८५ गावांचा पाणीप्रश्न सुटला

'नदी जोड प्रकल्पाद्वारे आपण हे पाणी वळवू शकतो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला या पाण्याचा फायदा होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Eknath Shinde News: विकास पाहून काहींना पोटदुखी होते; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.