PM Narendra Modi: PM मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचं लोकार्पण;४६ वर्षांपासूनचा १८५ गावांचा पाणीप्रश्न सुटला

Nilwade canal : पंतप्राधानांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण होत आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam Tv
Published On

Prime Minister Modi Inaugurate Nilwade Dam:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. मोदींचा हा दौरा शिर्डीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधानांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निळवडे धरणाचं लोकार्पण केलं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. (Latest News)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जल अर्पण करून धरणाचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी धरणातून पाणी सोडलं. निळवंडे धरणाच्या लोकार्पणामुळे राज्यातील ७ तहसीलला याचा फायदा होणार आहे. यात अहमदनगरच्या ६ आणि नाशिकच्या १ तहसीलचा मधल्या १८५ गावांचा फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी ५,१७७ कोटी रुपयांचा खर्च झाला.

 (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

काय आहेत या धरणाचे वैशिष्ट्ये

  • या धरणाची क्षमता ८.३२ टीएमसी असल्याचं सांगितलं जात आहे.

  • या धरणाच्या पाण्याचा लाभ क्षेत्र ६८ हजार ८७८ हेक्टर परिसराला होणार आहे.

  • अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व सिन्नर (नाशिक). या तालुक्यांना फायदा होणार आहे.

  • लाभ मिळणारी गावे १८२.

  • आठ महिने सिंचन धोरण लागू असणारा निळवंडे हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प आहे.

  • डावा कालव्याची लांबी ८५ किमी आहे.

  • उजवा कालव्याची लांबी ९७ किमी आहे.

  • धारणास चार कालवे असणारे राज्यातील हे एकमेव धरण.

  • धरणामुळे संपर्क खंडित होणाऱ्या गावांसाठी धरण जलाशयात उड्डाणपूल होणार आहे.

या निळवंडे धरणाला ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाने ओळखलं जातं. या प्रकल्पाचा इतिहास ५० वर्षांपेक्षा जूना आहे. १९७० मध्ये प्रवरा नदीवर म्हाळादेवी येथे धरण बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. १९७७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र धरणात बुडणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे धरणाची जागा दोन वेळ बदलावी लागली होती अखेर निळवंडे येथे जागा निश्चित झाली. पुनर्वसनाच्या प्रश्नावरून प्रकल्पग्रस्त आंदोलन करत या प्रकल्पाची कामे अनेकवेळा बंद पाडले होते.

PM Narendra Modi
Narendra Modi News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साईचरणी, सभास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com