
महायुती सरकारचा शपथविधी उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे कोडं सुटत अखेर देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. केंद्रातून आलेल्या भाजपच्या दोन निरीक्षकाच्या उपस्थितीत फडणवीस यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आलीय. याचदरम्यान शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका व्हायरल होतेय. यातून अनेक प्रश्नांचे उत्तर मिळाले तर अनेक नवीन प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार आहेत, मात्र या शपथविधीसोहळ्यात पंतप्रधान मोदी येणार असलेल्या इतर मंत्रीसुद्धा आपल्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुरुवातील फक्त तीन प्रमुख नेत्यांचाच शपथ होणार होता, परंतु आता इतर मंत्रीसुद्धा शपथ घेणार आहेत.
गेल्या १३ दिवसांपासून मुख्यमंत्री कोण होणार आणि गृहमंत्रिपदावरून महायुतीत पेच निर्माण झाला होता. आज अखेर मुख्यमंत्रिपदाच्या नावावरील पेच सुटला मात्र गृहमंत्रिपदाबाबतील पेच कायम आहे. याच दरम्यान आज भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व आमदारांनी एकमताने फडणवीस यांच्या नावाला पसंती देत त्यांची निवड केली गेली.
उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका व्हायरल झालीय. मंगळवारी सत्ता स्थापनेबाबत फडणवीस आणि शिंदे यांच्यात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अर्धा तास बंद द्वाराआड चर्चा झाली. यात मंत्रिपदे आणि खातेवाटपसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
त्याच्यासोबत अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या नेत्यांसह इतर सदस्यही शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. या पत्रिकेत शपथ सोहळा कधी, कुठे, किती वाजता होणार याची माहिती देण्यात आलीय. तसेच कोण-कोण मंत्री शपथ घेणार याची माहिती देण्यात आलीय.
आझाद मैदानावर नेमके किती मंत्री शपथ घेणार याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये. दरम्यान तिन्ही पक्षांचे मिळून किमान २० मंत्री शपथ घेऊ शकतात, असं म्हटलं जात आहे. सर्व समाज घटकांतील नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भाजप २१ ते २२
शिंदे सेना - १२ ते १३
अजित पवार गट - ८ ते ९
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.