देशाच्या सुरक्षेला बूस्ट; शिर्डीतून होणार अत्याधुनिक शस्त्रनिर्मिती, वर्षाला 5 लाख तोफगोळे तयार होणार

Defence Manufacturing Cluster In Shirdi Maharashtra: शिर्डीत उभारलेल्या डिफेन्स क्लस्टरचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळणार असून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना बळ मिळणार आहे.
Defence Minister Rajnath Singh inaugurates the defence manufacturing cluster in Shirdi in the presence of CM Devendra Fadnavis.
Defence Minister Rajnath Singh inaugurates the defence manufacturing cluster in Shirdi in the presence of CM Devendra Fadnavis.saam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच सुरू होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात वर्षाला तब्बल पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता आहे. राजनाथ सिंह यांनी प्रकल्पाची पाहणी करत या डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन केले.

Defence Minister Rajnath Singh inaugurates the defence manufacturing cluster in Shirdi in the presence of CM Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis On Sharad Pawar | शरद पवार केंद्रात असताना 2 वेळा निर्यात बंदी

शिर्डीतील हा डिफेन्स क्लस्टर मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणारा आहे. या प्रकल्पातील उत्पादन तंत्रज्ञान आणि कच्चा माल स्वदेशी आहे. अवघ्या एका वर्षात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शिर्डी परिसरात संरक्षण उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डीत आता भक्ती सोबत देशाच्या संरक्षण शक्तीचाही प्रत्यय येणार आहे. सुमारे दोनशे एकर परिसरात रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन तसेच विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत.

Defence Minister Rajnath Singh inaugurates the defence manufacturing cluster in Shirdi in the presence of CM Devendra Fadnavis.
Justice For Parents : जशी करणी तशी भरणी! ज्यानं माता पित्याला घराबाहेर काढलं तोच आला रस्त्यावर

रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंज आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे आधीपासूनच संरक्षण क्षेत्राशी नाळ जोडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याला शिर्डीतील या प्रकल्पामुळे देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे.

Defence Minister Rajnath Singh inaugurates the defence manufacturing cluster in Shirdi in the presence of CM Devendra Fadnavis.
Sharad Pawar News | केवळ गुजरातचा विचार करणारे देशाच्या सत्तेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

आज आपल्या देशासाठी ऐतिहासिक दिवस

- मोदींनी मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत असे दोन संदेश दिले होते

- संरक्षण क्षेत्रात हा संदेश अमलात आणण्याची जबाबदारी रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी स्वीकारली

- दुसऱ्यावर अवलंबून असलेला देश आत्मनिर्भर बनतोय

- वेगवेगळ्या देशांना आपल्या देशातून शस्त्र दिली जाणार

- ड्रोन, मिसाईल्स तयार होत आहेत

- देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय मोठे कार्य झाले.

- पाकच्या ड्रोन, मिसाईल्सला आपल्या सैन्याने हवेतच नष्ट केले.

- अहिल्यानगर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब

- इथे पाच हजार कोटींची गुंतवणूक झालीय.. चार हजार लोकांना रोजगार मिळणार

- शांतीचा संदेश देण्याचे काम साई बाबांनी केले

- ज्याच्याकडे शक्ती आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो

- भारताने कधी स्वतःहून कुणावर आक्रमण केले नाही

- जे आक्रमणकारी आले त्यांना पळवून लावण्याचे काम आपण केलेले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com