Manasvi Choudhary
शिर्डी हे साईबाबा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. शिर्डीत साईबाबांचे मंदिर आहे.
दरवर्षी लाखो भाविक शिर्डी देवस्थानाला भेट देतात. तुम्ही देखील शिर्डीला जाणार असाल तर तुम्हाला आजूबाजूची प्रसिद्धे ५ ठिकाणे माहित असणं महत्वाचे आहे.
शिर्डीजवळील या 5 ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला घरीच परत यावेसे वाटणार नाही.
शिर्डीपासून ११५ किलोमीटरवर अमृतेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. काळ्या आणि लाल दगडांनी बनवलेले हे मंदिर प्राचीन काळातील आहे.
शिर्डीतील टायगर व्हॅली हे प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे. हिरव्या निसर्गसौंदर्याने नटलेलं हे ठिकाण ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केद्रबिंदू आहे.
शिर्डीत खंडोबा, बनाई आणि म्हाळसाई यांचे मंदिर आहे. शिर्डी स्टेशनपरिसरात हे मंदिर असल्याने येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.
हाजी अब्दुलबाबांची झोपडी असे नाव असलेले हे छोटेसे घर आहे. अब्दुल बाबा हे साई बाबांचे भक्त होते यामुळे साईबाबांनी अब्दुल बाबांना हे घर दिले होते असं म्हटलं जात आहे.
लेंडी गार्डनमध्ये साई बाबांची मोठी मूर्ती आहे. शिर्डीतील साई बाबा या बागेत ध्यान करायचे असे म्हटलं जाते.