Gondia Congress : ओबीसी वसतीगृहाचा मुद्दा सरकराने मार्गी लावावा, गाेंदियात काॅंग्रेसची मागणी

congress demands to beign obc hostel works in maharashtra: विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचा ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
congress demands to beign obc hostel works in maharashtra
congress demands to beign obc hostel works in maharashtraSaam Digital

- शुभम देशमुख

इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे ७२ वसतिगृहे सुरू केले जातील अशी घोषणा सरकार मार्फत करण्यात आली होती. या घोषणेचा राज्य सरकारला विसर पडला आहे असा आराेप करीत सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ७२ वसतिगृहे तत्काळ सुरू करावीत अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गोंदिया ओबीसी काॅंग्रेस सेल आणि ओबीसी अधिकार मंचने दिला. याबाबतचे निवेदन काॅंग्रेसने जिल्हाधिकरी, उपविभागीय अधिका-यांना दिले.

congress demands to beign obc hostel works in maharashtra
Saam Tv Impact Video : मुलांना नांगराला जुंपलेलं बघून सरकार हळहळलं; शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा, सामच्या बातमीची दखल!

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेत ओबीसी विभागाद्वारे वसतिगृह सुरु करण्यासंबंधी वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर आदेश सुद्धा देण्यात आले होते. संबंधित वेळापत्रकानुसार ५ मार्च २०२४ पासून ओबीसी वसतिगृहे सुरू होणार होते.

congress demands to beign obc hostel works in maharashtra
Maharashtra Milk Price Issue: दूधदरासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर, नगर जिल्ह्यात रास्ता राेकाे आंदाेलनास प्रारंभ (पाहा व्हिडिओ)

छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शासनाने वसतिगृहे सुरू करावीत अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली होती मात्र आतापर्यंत शासनाकडून या संदर्भात काहीच हालचाली झाल्या नाहीत. दरम्यान सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात तरी ओबीसी वसतीगृहाचा मुद्दा सरकराने मार्गी लावावा अन्यथा जन आंदोलन उभारू असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

congress demands to beign obc hostel works in maharashtra
Satara Picnic Spot: महाबळेश्वरच नाही तर पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील या ठिकाणांना द्या आवश्य भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com