Vidhan Sabha Election : ओबीसी समाज महाराष्ट्रातील सर्व जागांवर लढणार, विधानसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ : संग्राम माने

obc samaj will contest 288 constituencies vidhan sabha election: ओबीसी समाजाच्या भूमिका घेणाऱ्या उमेदवारांनाच निवडून आणावं असे आवाहन संग्राम माने यांनी सांगलीत केले.
obc samaj will contest 288 constituencies vidhan sabha election says sangram mane
obc samaj will contest 288 constituencies vidhan sabha election says sangram maneSaam Tv
Published On

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच म्हणजेच 288 मतदार संघात ओबीसी उमेदवार निवडणुक लढतील असे सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम माने यांनी नुकतेच जाहीर केले. ओबीसी समाजाचे आमदार निवडून आणण्यासाठी समाजाने देखील मतदानाच्या रूपाने आपली ताकद दाखवून द्यावी असे आवानन ओबीसी बांधवांना संग्राम माने यांनी केले.

संग्राम माने म्हणाले सांगली जिल्ह्यासह राज्यात ओबीसी समाजात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सांगलीच्या आठ विधानसभा मतदारसंघात देखील ओबीसी उमेदवार उभे केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार असेल मग तो कोणत्याही पक्षाचा आणि निवडून येण्याची क्षमता असेल तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका घेणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

obc samaj will contest 288 constituencies vidhan sabha election says sangram mane
Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाला सांगलीकरांचा विराेध, अधिसूचनेची केली होळी

लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाजातल्या दिग्गज नेत्यांच्या पराभव झाला कारण ओबीसी समाज एकवटला नाही अशी खंत संग्राम माने यांनी व्यक्त केली. पण आता ओबीसी समाजातील आमदार निवडून आणण्यासाठी समाजाने देखील मतदानाच्या रूपाने आपली ताकद दाखवून द्यावी असेही माने यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

obc samaj will contest 288 constituencies vidhan sabha election says sangram mane
Nanded News : नांदेडहून आता पुणे, नागपूरला विमानसेवा, जाणून घ्या शुल्क

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com