ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पाहण्यासाठी पर राज्यातील पर्यटक जात असतात.
मात्र सातारा जिल्ह्यातील या ठिकाणांना तुम्ही पावसाळ्यात भेट दिली आहे का?
सातारा जिल्ह्यातील भांबवली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
महाबळेश्वरपासून काही अंतरावर तापोळा हा तलाव आहे. पावसाळ्यात या ठिकाणी एकदा तरी नक्की जाऊन यावे.
सातारा शहरापासून काही अंतरावर भांबवली पुष्प पठार आहे. पावसाळ्यात हा परिसर संपूर्ण हिरवाईने नटून जातो.
महाबळेश्वर पासून काही अंतरावर पाचगणी हे ठिकाण आहे. पावसाळ्यात पाचगणी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
सातारा जिल्ह्यातील कास तलाव हे ठिकाण हे पावसाळ्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तुम्हीही कास तलाव पाहण्यासाठी एकदा तरी नक्की भेट द्या.