CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक सरकार कोसळणार? CM एकनाथ शिंदेंनी दिले मोठे संकेत

CM Eknath Shinde on karnataka government :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचं संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
CM Eknath Shinde :
CM Eknath Shinde :Saam tv

नाशिक : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वारे वाहू लागले आहेत. सर्व बड्या राजकीय नेत्यांनी उमेदवारांसाठी मेळावे, सभांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे पक्षातील नेत्यांची फोडाफोडी देखील सुरु आहे. अनेक नेते, माजी आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल पक्षाचा मेळावा झाला. यावेळी ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. यवेळी या कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या कर्नाटक सरकारविषयी मोठं वक्तव्य केलं. कर्नाटकात सध्या काँग्रेस नेते सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत.

CM Eknath Shinde :
Chicken shawarma : शोरमा खाणं मुंबईकर तरुणाच्या जीवावर बेतलं; पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल पक्षाचा मेळावा झाला. यावेळी ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. यावेळी या कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या कर्नाटक सरकारविषयी मोठं वक्तव्य केलं. कर्नाटकात सध्या काँग्रेस नेते सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत.

मुख्यमंत्री शिंदे नाशिकमध्ये काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'निलम गोऱ्हे, दादा भुसे पैशांसाठी माझ्याकडे आले नाहीत. अनेक जण सोबत येत आहेत. आमदारानंतर १३ खासदार माझ्यासोबत आले. संपूर्ण राज्यातील लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत आहे. देशातील २५ राज्यातील लोक आपल्यासोबत आहेत.

CM Eknath Shinde :
Boycott Election : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; प्रांताधिकाऱ्यांची बैठक असफल

'राजस्थानमधील ४ अपक्ष आमदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अनेक लोक आपल्यासोबत येण्याचा विचार करताय. आपण इतिहास घडवला आहे. आपण करेक्ट कार्यक्रम केला आहे. कर्नाटकात गेलो होतो. कर्नाटकातही लोटस ऑपरेशन सुरु आहे. लोकसभेनंतर तिथे होईल. ते म्हणाले तुमचा अनुभव कामी येईल, असं म्हणत शिंदे यांनी कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com