सचिन कदम
रायगड : पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर (Raigad) कायम आहेत. आज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी वरसई येथील मंदिरात बैठक घेवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या बाळगंगा धरण साधारण १३ वर्षांपूर्वी सुरू होऊन सध्या या धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. धरणाच्या प्रकल्पग्रस्त ६ गावांमध्ये जवळपास ८ हजार मतदार आहेत. संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याबत इशारा देत पुनर्वसन करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा (Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकीचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान आतापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर कायम आहेत. (Raigad Lok Sabha) रायगड मतदार संघात ७ तारखेला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी यांनी प्रकल्पग्रस्थांची बैठक घेतली होती. मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने आजच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.