मनोज जयस्वाल
वाशिम : खरीप हंगाम तोंडावर असल्याने पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना (farmer) पीक कर्जासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेऊन (Washim) वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध केली.
खरीप हंगाम (Kharif Season) सुरु होण्यास अजून महिनाभराचा कालावधी आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. असे बागायतदार शेतकरी मी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागवड करण्यास सुरवात करत असतात. यामुळे खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांची पीक कर्ज (Crop Loan) घेण्यासाठी बँकांमध्ये आतापासून फेऱ्या मारण्यास सुरवात झाली आहे. या शेतकऱ्यांना बऱ्याचदा बँकांकडून अडवणूक करत फिरवाफिरव केली जात असते. हे प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
अडचण आल्यास करा तक्रार
टोल फ्री क्रमांकावर केवळ पीककर्जासंबंधी तक्रारी, अडचणी मांडता येणार आहेत. या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविताना शेतकऱ्यांनी आपलं नाव, बँकेचे नाव आणि बँकेच्या शाखेच्या नावाचाही तपशील द्यावा; असं आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.