Chicken shawarma : शोरमा खाणं मुंबईकर तरुणाच्या जीवावर बेतलं; पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Chicken shawarma News : पोलिसांनी बेकायदेशीर शोरमा विक्रेत्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच यानंतर पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई सुरु केली आहे.
Chicken shawarma : शोरमा खाणे जीवावर बेतलं; पोलिसांनी सांगितलं तरुणासोबत नेमकं काय घडलं?
boy Dies After Eating Shawarma:Saamtv
Published On

मुंबई : मुंबईच्या मानखुर्दमध्ये १९ वर्षीय तरुणाचा चिकन शोरमा खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. तरुणाच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर शोरमा विक्रेत्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच यानंतर पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई सुरु केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,मानखुर्दच्या ट्रॉम्बे परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी कोर्टाने आनंद कांबळे, अहमद शेख यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच शोरमाचे नमुने तपासासाठी अन्न औषध प्रशासन आणि फोरेन्सिक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून अस्वच्छ मांस, मेलेल्या कोंबड्यांचा मांसाचा वापर केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Chicken shawarma : शोरमा खाणे जीवावर बेतलं; पोलिसांनी सांगितलं तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश भोकसे (१९), हामीद सय्यद (४०) हे दोघे ३ मे रोजी मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर येथील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर गेले होते. या स्टॉलवरील शोरमा खाल्ल्यानंतर प्रथमेशला उलट्या आणि पोटात दुखू लागलं. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारानंतरही त्याची प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर त्याला ५ मे रोजी केम रुग्णालयात हलविण्यात आलं'.

Chicken shawarma : शोरमा खाणे जीवावर बेतलं; पोलिसांनी सांगितलं तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Chicken Shawarma : चिकन शोरमा खाल्ल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

'तेथे त्याच्यावर पुन्हा उपचार करून घरी सोडण्यत आले. पण रविवारी पुन्हा त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर पुन्हा केम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण सोमवारी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com