Maratha Andolan: बाबा... तुमचं पोरगं लय भारी; CM शिंदे जरांगे पाटलांच्या वडिलांना काय म्हणाले?

CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: बाबा... तुमचं पोरगं लय भारी, तो निस्वार्थी आहे. सच्चा आहे, त्याने वैयक्तीक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. असं मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांना सांगितलं.
CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil
CM Eknath Shinde on Manoj Jarange PatilSaam TV
Published On

CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तब्बल १७ व्या दिवशी जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. एकनाथ शिंदे आज जालन्यात मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या धाडसाचं तोंडभरून कौतुक केलं.(Latest Marathi News)

CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil
Maratha Reservation: सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं

मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडलं. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या वडिलांनाही मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) ज्यूस पाजलं. यावेळी त्यांनी बाबा... तुमचं पोरगं लय भारी, तो निस्वार्थी आहे. सच्चा आहे, त्याने वैयक्तीक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. असं मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांना सांगितलं.

एक साधा आणि जिद्दी कार्यकर्ता कसा असतो, हे जरांगे पाटील यांना पाहिल्यावर कळतं, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. एखादं आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं आणि जिद्दीने पुढे नेणं आणि त्याला महाराष्ट्राच्या जनतेचा प्रतिसाद मिळणं, हे खूपच कमीवेळा पाहायला मिळतं.

CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil
Eknath Shinde Jalna Speech : मनोज जरांगे है कौन? एकनाथ शिंदेंनी सांगितला दिल्लीतील किस्सा!

पण, ज्या आंदोलनकर्त्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो त्याच्यामागे जनता उभी राहते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटील यांचं तोंडभरून कौतुक करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राज्य सरकार येत्या एक महिन्याच्या आतच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावणार, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलकांना दिलं.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आपल्या पोराचं कौतुक ऐकताच मनोज जरांगे यांचे वडील भावूक झाले होते. तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचं वाटोळं करु नका, आम्ही तसले धंदे करत नाहीत. आम्हाला आरक्षणाशिवाय काहीच नको आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या, असं मनोज जरांगे यांचे वडिल म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com