मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरावाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण १७ दिवसांनंतर मागे घेतलं आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं भरभरुव कौतुक केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांसोबत एक किस्सा शेअर केला. मी दिल्लीत गेलो होतो. तिथेही मनोज जरांगे यांची चर्चा होती. लोक मला विचारत होते, ये मनोज जरांगे है कौन..?, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मनोज जंरागे पाटील यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मला जेव्हाही ते भेटायचे मराठा समाज आणि आरक्षणाबद्दल थेट भूमिका त्यांनी मांडली. मी मनोज जरांगे पाटील यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. एखादं आंदोलन जिद्दीने आणि चिकाटीने पुढे नेलं तरी त्याला प्रतिसाद मिळतो हे कमी वेळा पाहायला मिळतं.
पण तुमचा हेतू शुद्ध होता म्हणून ज्यांचा हेतू शुद्ध असतो त्यांच्यामागे जनता उभी राहते. माझ्या हातून तुम्ही उपोषण सोडलं याबाबत मी तुमचे आभार व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, शासनाची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वी सरकारने आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं, मात्र सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टीकलं नाही. का टीकलं नाही यावर मी आता बोलत नाही. नेमकं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतरही ३७०० मराठा तरुणांच्या रखडलेल्या नोकऱ्या आम्ही दिल्या. मराठा समाजाला फायदे मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, जी भूमिका मनोज जरांगेची आहे तीच भूमिका सरकारची आहे.
लाठीहल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना माफी मागितली आहे. मराठा समाज शिस्तप्रिय आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असं मराठा समाजाने कधीही काम केलं नाही. आंदोलन, मोर्चे कसे काढावे हे मराठा समाजाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मी दिले आहेत. गावकरी गुन्हेगार नाही. तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.