'मतचोरी नाही, यांचा मेंदूच चोरीला गेलाय!' फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींकडे केली अजब मागणी...

Devendra Fadnavis Rahul Gandhi : मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. विरोधकांचा मेंदू परत आणण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis statement on Rahul Gandhi vote theft allegations
Devendra Fadnavis statement on Rahul Gandhi vote theft allegations Saam TV
Published On: 

Devendra Fadnavis statement on Rahul Gandhi vote theft allegations : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसकडून निवडणूक आयोगावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. "शनिवारी तिन्ही निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बनावट नरेटिव्ह (Fake Narrative) पूर्णपणे उध्वस्त झाले आहे," असा घणाघाती दावा त्यांनी केला. हे सतत मतचोरीचा जप करत आहेत, पण प्रत्यक्षात यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे असा हल्लाबोलही यावेळी फडणवीस यांनी केला.

'विरोधकांचा मेंदू परत आणण्यासाठी समिती नेमा'

विरोधकांच्या 'व्होट चोरी'च्या आरोपांवर खोचक टोला लगावत फडणवीस म्हणाले, "हे सतत मतचोरीचा जप करत आहेत, पण प्रत्यक्षात यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे! विरोधकांचा चोरीला गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत आणता येईल का? यासाठी एखादी चौकशी समिती किंवा व्यवस्था करता येईल का, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे."

पश्चिम बंगालचे उदाहरण देत ते म्हणाले की, एसआयआर (SIR) अंतर्गत ज्या १५ मतदारसंघांत नावे कमी झाली, तिथे भाजपचे मतदार जास्त असतानाही तृणमूल काँग्रेस (TMC) कशी निवडून आली? त्यामुळे शहरात असो वा गावात, विरोधकांचे हे आरोप पूर्णपणे फोल ठरले आहेत.

Devendra Fadnavis statement on Rahul Gandhi vote theft allegations
House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

संविधान संस्थांना बदनाम करण्याचे डिझाईन

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "हातात संविधानाचे पुस्तक घ्यायचे आणि रोज संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करायचे, हे राहुल गांधींचे ठरलेले डिझाईन आहे. त्यांना लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास राहिलेला नाही. संस्थांवर प्रश्न उपस्थित करून जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडवणे, हाच त्यांचा एकमेव प्रयत्न आहे."

Devendra Fadnavis statement on Rahul Gandhi vote theft allegations
सिनेमात रोल देण्याचं आमिष अन् भयानक कृत्य! २० वर्षांच्या तरुणीसोबत घडला हादरवणारा प्रकार; मुंबईतील 'त्या' गायकाचा खरा चेहरा समोर

"राहुल गांधींची मानसिकता अति-डावी"

फडणवीस पुढे म्हणाले की, "राहुल गांधींची मानसिकता आता अति-डावी (Ultra-Left) झाली असून त्यांना देशात तशीच राजवट आणायची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटच्या भाषणात ज्या धोक्याचा इशारा दिला होता, अगदी तसेच कृत्य आज काँग्रेस करताना दिसत आहे. हळूहळू जनतेचा संविधानावरील विश्वास उडावा, यासाठीच हे सर्व षडयंत्र रचले जात आहे."

Devendra Fadnavis statement on Rahul Gandhi vote theft allegations
Accident : अंत्यविधीला जाताना कार अन् ट्रकची भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; अपघाताने एका क्षणात सर्व काही संपलं...

वृत्तपत्रातील बातमी कपोलकल्पित; आरोपांमधील फोलपणा उघडा

कॅबिनेट मंत्र्यांकडे गेलेल्या पत्राबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, "वृत्तपत्रात आलेली बातमी पूर्णपणे कपोलकल्पित आहे. ते पत्र दोन लाख मतपत्रिकांबद्दल नसून, प्रतिनियुक्तीवर (Deputation) झालेल्या नियुक्तीबाबतचे होते. तसेच 'फॉर्म नंबर ६' हा कोर्टाने ठरवलेल्या नियमानुसारच आहे. परंतु, जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे."

"कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली की निवडणूक आयोग चांगला असतो; पण भाजप जिंकली की लगेच त्याच आयोगाला दोषी ठरवले जाते. आधी त्यांनी ईव्हीएमवर (EVM) आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि आयोगाने आव्हान देऊनही कोणीही EVM हॅक करून दाखवू शकले नाही. आता EVM सोडून निवडणूक आयोगालाच घेरण्याचा चुकीचा प्रयत्न सुरू आहे," असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com