Chhatarpur SUV truck accident five people killed : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एसयूव्ही (SUV) गाडीची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अंत्यविधीला जातानाच कुटुंबावर काळाने घाला घातला अन् अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धडक इतकी भयानक होती की एसयूव्ही गाडीचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
अपघातानंतर महामार्गावर काही काळासाठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातामधील ५ मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला कारून वाहतूक सुरळीत केली आहे. स्थानिक पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ट्रक आणि एसयूव्ही यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात चौका गावाजवळ झाला. या अपघातात २ ते ३ जण जखमी आहेत. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण ३० ते ५० वयोगटातील आहेत. सर्वांची ओळख पटण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातग्रस्त ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. भीषण अपघाताचे कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. कार आणि ट्रकची धडक इतकी जोरदार होती. या अपगातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. कारचा चक्काचूर झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.