देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक मोठा निर्णय, पोलिसांसाठी ₹१७६८ कोटी मंजूर

Maharashtra Police Housing : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ५४५९ पोलिसांसाठी घरबांधणी अग्रीम निधी म्हणून १७६८.०८ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हजारो पोलिसांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra Police
Maharashtra PoliceMaharashtra Police
Published On

Devendra Fadnavis police housing scheme : महाराष्ट्रातील शेकडो पोलिसांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या घरासाठी तब्बल १७६८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती जाहीर केली. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पोलिसांच्या घरासाठी पैसे मंजूर केल्याची माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर निशाणा साधलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी काय केले ट्वीट?

जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली. आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

Maharashtra Police
Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फायदा राज्यातील ५४५९ पोलिसांना होणार आहे. या सर्व पोलिसांना हक्काचे घर मिळावे, त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. पोलीस कर्मचारी सर्वसामान्यांसाठी दिवसरात्र सातत्याने सुरक्षेसाठी काम करतात. त्या सर्वांना आता हक्काचे घर मिळेल. यासाठी देवेंद्र फडणवीस नेहमीच आग्रही होते. मुख्यमंत्रि‍पदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबवली होती.

Maharashtra Police
Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज घोषणा करताना,५४५९ पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी रुपयांच्या घरबांधणी अग्रीम निधीला मंजुरी दिल्याची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत पोलिसांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Maharashtra Police
पुण्यात खळबळ, हॉटेलच्या खोलीत आढळला प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह, हत्या की घातपात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com