Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, इकडं महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाडाझडती, नेमकं काय घडतंय?

Pahalgam Terror Attack News : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाडाझडती सुरु झाली आहे. जळगावमध्ये नेमकं काय घडतंय, जाणून घ्या.
Pahalgam Terror
Pahalgam Terror AttackSaam tv
Published On

जळगाव : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खौऱ्यात निष्पाप पर्यटकांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा संपूर्ण देशात निषेध नोंदवला जात आहे. निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. केंद्राने भारतातून पाकिस्तानला जाणारं नदीचं पाणी देखील रोखलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना स्वगृही जाण्याचे आदेश दिले आहेत. काही पाकिस्तानी नागरिक जळगावमध्येही आढळले आहेत.

Pahalgam Terror
Badlapur : रेल्वेची मनमानी, बदलापूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमाक १ बंद; प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, गर्दीचा धडकी भरवणारा VIDEO

जळगावात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांची पोलीस प्रशासनाने पडताळणी केली आहे. यामध्ये सार्क व्हिजा घेऊन पाकिस्तानातून जळगावमध्ये कोणीही आले नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तर टुरिस्ट व्हिजा घेऊन जळगावमध्ये पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तींची संख्या ही ३२७ एवढी आहे. त्यातील १२ व्यक्तींनी मुदत वाढीसाठी अर्ज केला आहे.

Pahalgam Terror
Massive Anti Naxal Operation : ३०० नक्षलवाद्यांना ४००० जवानांनी घेरलं; ४८ तासांपासून चकमक सुरु, आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑपरेशन

पाकिस्तानातून जळगावात आलेल्या व्यक्ती संदर्भात शासन पातळीवरून जे आदेश येतील. त्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते म्हणाले, 'जळगावमध्ये टुरिस्ट व्हिसावर आलेले नागरिक आहेत. आपल्यावर सार्क व्हिसावरील कोणी नाही. टुरिस्ट व्हिसावरील लोकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. काहींनी टुरिस्ट व्हिसाच्या मुदत वाढीसाठी अर्ज केला आहे. सरकारकडून जे निर्देश येतील, त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

'टुरिस्ट व्हिसा असणारे एकूण ३२७ लोक आहेत. मुदत वाढीसाठी अर्ज करणारे १२ लोक आहेत. आम्हाला अद्याप कारवाईबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. सरकारकडून वेगळ्या काही सूचना मिळाल्यास आम्ही त्यानुसार कारवाई करू, असे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले.

Pahalgam Terror
Pahalgam terror attack : मुस्लीम असल्याची लाज वाटतेय; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावर गायक मनातलं बोलून गेला

धुळ्यातील तृतीयपंथीयांची मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे सुटका

जम्मू कश्मीरच्या पहलगाम येथे अडकलेल्या धुळ्यातील तृतीयपंथीयांची अखेर मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे तेथून सुटका झाली आहे. कालपासून धुळ्यातील तृतीयपंथी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी आणि त्यांचे चार सोबती त्या ठिकाणी अडकलेले होते. त्यानंतर पार्वती जोगी यांनी मदतीची हाक दिली होती.

साम टीव्हीनेही बातमी लावून धरल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली. मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी पोहोचून या सर्व जणांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना श्रीनगर एअरपोर्टवर सुखरूप आणलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com