Badlapur : रेल्वेची मनमानी, बदलापूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमाक १ बंद; प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, गर्दीचा धडकी भरवणारा VIDEO

Badlapur station crowd : रेल्वे प्रशासनाने बदलापूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमाक १ बंद केला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रचंड गर्दीत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
Badlapur News
BadlapurSaam tv
Published On

मयुरेशन कडव, साम टीव्ही

बदलापूर : रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 लोखंडी जाळ्या लावून बंद केला आहे. त्यामुळे होम प्लॅटफॉर्मवर प्रचंड ताण येत आहे. गर्दीच्या वेळी या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच होम प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असताना रेल्वे अधिकाऱ्यांनी घाईघाईत जाळ्या लावण्याचा निर्णय का घेतला असा संतप्त सवाल रेल्वे प्रवाशांमधून विचारला जातोय. या जाळ्या लावल्यामुळे बदलापुरातील होम प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी मनमानी करत बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लोखंडी जाळ्या टाकून प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतर बदलापुरातील रेल्वे प्रवासी आणि लोक प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यांनी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. खासदार सुरेश म्हात्रे यांनी दीड महिन्यात जाळ्या न हटवल्यास जनतेला सोबत घेऊन जाळ्या काढून टाकण्याचा इशारा दिला.

Badlapur News
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

रेल्वे प्रशासनाने नेमका काय निर्णय घेतलाय?

मध्य रेल्वेच्या तुघलकी कारभाराचा बदलापुरातील रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद केला आहे. रेल्वेच्या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खरंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच घेतला होता. मात्र, प्रवाशांच्या विरोधानंतर रेल्वेकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनानं जुनाच पुन्हा घेतला.

Badlapur News
Turkey Earthquake : तुर्कीत भूकंपाचा जोरदार धक्का, इमारती हादरल्या; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मेगाब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गोपनीयता पाळली होती. सध्या अस्तित्वात असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा कायमस्वरूपी रेलिंग लावून बंद करण्यात आली आहे. यामुळे बदलापूर पूर्वेकडे राहणाऱ्या प्रवाशांची मोठी फरफट होत आहे. तसेच पूर्वेकडील प्रवाशांना पश्चिमेकडे जाऊन होम प्लॅटफॉर्मवरून लोकल पकडावी लागेल. होम प्लॅटफॉर्मच्या नावाखाली मध्य रेल्वे प्रशासनानं बदलापूरकरांची केलेली ही मोठी फसवणूक केली आहे, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com