Shocking : भयंकर! नामांकित शाळेत दहावीच्या ४ विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं?

Sambhajinagar School Crime News : छत्रपती संभाजीनगरमधील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ वादातून दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने चार वर्गमित्रांवर पॉकेट चाकूने वार केले. चार विद्यार्थी जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
Chhatrapati Sambhajinagar School Knife Attack: Four Students Injured
Chhatrapati Sambhajinagar School Knife Attack: Four Students Injured AI Generated Image
Published On
Summary
  • छत्रपती संभाजीनगरमधील देवगाव रंगारी येथील शाळेत धक्कादायक घटना

  • किरकोळ वादातून दहावीच्या विद्यार्थ्याने चार वर्गमित्रांवर पॉकेट चाकूने वार केले

  • हल्ल्यात चार विद्यार्थी जखमी, एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर

  • घटनेनंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले

छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगाव रंगारी येथील एका शाळेत किरकोळ कारणावरून धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गातीलच चार विद्यार्थ्यांवर पॉकेट चाकूने वार केले. या हल्ल्यात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली असून शाळा प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे काल म्हणजे ६ ऑगस्ट रोजी गुरुवारी शाळा भरली. काही तासानंतर साडेअकराच्या सुमारास शाळेत जेवणाची सुट्टी झाली होती. जेवणानंतर मुलांनी हात धुण्यासाठी लाईन लावली. यादरम्यान एका विद्यार्थ्याचा धक्का त्याच्या वर्गातील काही मुलांना लागला. मला धक्का का दिला यावरून मुलांमध्ये वाद सुरु झाला. मात्र पाहता पाहता क्षुल्लक वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले.

Chhatrapati Sambhajinagar School Knife Attack: Four Students Injured
Healthy Lifestyle : जेवणानंतर पोट फुगतंय आणि गॅस होतोय? 'या' एका पाण्याने मिनिटांत मिळेल आराम

या वादातून संतापलेल्या विद्यार्थ्याने ‘थांबा, तुम्हाला बघतोच,’ अशी धमकी दिली आणि तो वर्गाच्या दिशेने निघून गेला. काही वेळातच तो स्वतःसोबत पॉकेट चाकू घेऊन परतला. विद्यार्थ्याने खिशातील चाकू काढून ४ विद्यार्थ्यांवर हल्ला केला. हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या उजव्या दंडावर गंभीर दुखापत झाली. एका विद्यार्थ्याच्या उजव्या पायावर, तर दुसऱ्याच्या पाठीवर वार झाला. रक्तबंबाळ अवस्थेतील विद्यार्थ्यांना पाहून शाळेत एकच खळबळ उडाली.

Chhatrapati Sambhajinagar School Knife Attack: Four Students Injured
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

शाळा प्रशासनाने तातडीने जखमी विद्यार्थ्यांना गावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्याला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शाळा परिसरात पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com