छत्रपती संभाजीराजेंवर विकिपिडियानं तोडले तारे, कमाल खाननं ओकली गरळ, 'साम'च्या बातमीनंतर सरकारचे कारवाईचे आदेश

Kamaal Khan Controversy : छत्रपती संभाजीराजेंच्या ऑनलाईन बदनामीचा डाव आखण्यात आलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. नेमका काय आहे हा कट ? वादग्रस्त अभिनेता कमाल खाननं यात कसं तेल ओतलं? आणि साम टीव्हीनं हा कट कसा उधळून लावला? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट
kamaal r khan controversy wikipedia
kamaal r khan controversy wikipediasaam tv
Published On

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्याच्या कथा प्रत्येकाला माहित आहेत. पंडितालाही लाजवतील अशी विद्वत्ता आणि धाडसाच्या कथांचा इतिहास प्रत्येकाला अचंबित करणारा असाच. याच स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांची मोहिनी उशिरा का होईना बॉलीवुडला पडली आणि त्यांच्यावर पराक्रमाला गौरवित करत छावा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. नव्या वर्षात छावाची हवा चित्रपटगृहांमध्ये दिसली.

आणि इथेच भोजपूरी अभिनेता कमाल खाननं गरळ ओकली. आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे आणि वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या या कमाल खाननं छावा चित्रपटाचं समीक्षण करतांना विकीपिडीयावरील एक मजकूर पोस्ट केला. या पोस्टमधील मजकूर हा माथी भडकवणारा असून हा नेमका मजकूर काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही परंतू हा मजकूर शेअर करुन त्यानं काय दावे केलेत ते पाहूया.

- छत्रपती संभाजी महाराजांना शिवरायांनीच अटकेत ठेवल्याचा दावा

- छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे

- छत्रपती संभाजी महाराजांचे मुघलांशी संबंध

- छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजीराजेंना उत्तराधिकारी बनवणार नव्हते

kamaal r khan controversy wikipedia
Dance Bar : 'लाडकी'साठी राज्यात पुन्हा छमछम? तिजोरीवर भार, सरकारला हवेत डान्स बार?

स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांवर इतक्या नीच्च दर्जाचे आरोप करणाऱ्या कमाल खाननं सदर मजकूर विकीपिडीयावरुन शेअर केलाय. त्यामुळे हा मजकूर विकीपिडीयावर आधीच पोस्ट करण्यात आला होता. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर शिवप्रेंमीमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर साम टीव्हीनं हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन मजकूर हटवण्याबाब कारवाई करण्याचे आदेश दिले.

kamaal r khan controversy wikipedia
Dance Bar : 'लाडकी'साठी राज्यात पुन्हा छमछम? तिजोरीवर भार, सरकारला हवेत डान्स बार?

मुघलांना जेरीस आणणाऱ्या संभाजीराजेंच्या कौशल्यावर आणि त्यांच्या पराक्रमाच्या देदिप्यमान इतिहासावर कलंक लावणाऱ्या या विकीपिडीयाच्या या कथित लेखकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलीये. तसंच नेहमी केवळ प्रसिद्धीसाठी गरळ ओकणारा आणि वाद निर्माण करणारा अभिनेता कमाल खानंवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

kamaal r khan controversy wikipedia
Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात, फडणवीस-शिंदेंमध्ये कोल्ड वॉर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com