Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात, फडणवीस-शिंदेंमध्ये कोल्ड वॉर?

Mahayuti Politics : शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा कपात करून एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याची रणनीती असल्याची चर्चा रंगलीय. शिंदेंचा ठाकरे करण्याचा कुणाचा प्रयत्न आहे? आणि शिंदेंना कुठे कुठे कोंडीत गाठलंय ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट
Maharastra Politics
Maharastra PoliticsSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कुरघोडीचं राजकारण रंगलेलं असताना त्यात आणखी एका निर्णयामुळे भर पडलीय. फडणवीसांनी शिंदेंच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या वादाचा नवा अंक सुरु होण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं मात्र सावध भूमिका घेत थेट बोलणं टाळलंय. तर राऊतांनी सुरक्षेवरुन सरकारची खिल्ली उडवलीय.

एवढंच नाही तर व्हॅलेंटाईन वीकपुर्वीच महायुतीत कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं म्हटलं जातंय.. हा कुरघोडीचा सिलसिला कसा सुरु आहे? पाहूयात...

व्हॅलेंटाईन वीकमध्ये ब्रेकअपची ठिणगी?

- 6 फेब्रुवारी- सरनाईकांना डावलून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती

- 7 फेब्रुवारी- ठाण्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची घोषणा

- 9 फेब्रुवारी- आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी शिंदेंना वगळले, वादानंतर नियुक्ती

- 10 फेब्रुवारी- उद्योग खात्याचे अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याबद्दलल सामंतांची नाराजी

- 16 फेब्रुवारी- मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना शिंदेंकडून स्वतंत्र कक्षाची स्थापना

- 17 फेब्रुवारी- 20 शिंदे गटाच्या नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात

Maharastra Politics
Santosh Deshmukh Case : सरपंचाच्या हत्येनंतर बदनामीचा कट? दिशाभूल करण्यासाठी पोलिसांचा 'अनैतिक' डाव? पाहा स्पेशल रिपोर्ट

हे असं असलं तरी शिंदे आणि फडणवीसांनी कोल्ड वॉरच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महायुती सत्तेत आल्यापासून रुसवे-फुगवे आणि नाराजीनाट्य सुरुच आहे. एवढंच नाही तर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये उफाळून आलेला वाद महायुतीला ब्रेक-अप पर्यंत जाणार का? आणि एकनाथ शिंदेंचा ठाकरे करणार का? याकडे लक्ष लागलंय.

Maharastra Politics
Dombivli : डोंबिवलीतील बेघर होणाऱ्या ६५०० कुटुंबांना दिलासा, रहिवाशांसाठी कोणता पर्याय झाला खुला? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com