

राज्यातील अनेक भागात डिझेल टंचाईमुळे शेतकरी अडचणीत.
पेट्रोल पंपांवर साठेबाजी होत असल्याचा आरोप.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अचानक धाड टाकली.
राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामे रखडली आहेत. बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांनी इंधनासाठी ठिय्या मांडला आहे. अशात पेट्रोल पंप चालकांकडून साठेबाजी केली जात असल्याचे प्रकर समोर येत आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरातील असाच प्रकार घडला असून या पंपावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी धाड टाकली.
डिझेलचा पुरवठा केल्यानंतरही पंपावर शेतकऱ्यांना इंधन मिळत नव्हते, अशी तक्रार पालकमंत्र्यांकडे आली होती, त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्या पेट्रोल पंपावर धाड टाकली. एका पेट्रोल पंप चालकाने डिझेल नसल्याचा बनाव करुन तब्बल तीन हजार लिटर इंधनाचा साठा केला होता. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पेट्रोल पंपावर धाड मारली आणि डिझेलचं वितरण सुरू झालं. पालकमंत्री पंपावर आले असल्याचं समजातच पंप चालक तेथून पळून गेला.
पेट्रोल पंपावर डिझेल असूनही डिझेल देणं बंद केलं होतं, त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी भेट देऊन कारवाई करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पेट्रोल पंप चालकाने डिझेल वाटपाला सुरुवात केली. पेट्रोल पंपावर लाखो लिटर इंधनाचा पुरवठा झाला असताना डिझेल संपल्याचं सांगण्यात येतं होतं. डिझेल देणे बंद केले होतं, शेतकऱ्यांनी जाब विचारल्यानंतर शेतकऱ्याला संपलं असं सांगितलं गेलं. स्टॉक किती आहे हे दाखवत नव्हते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संदर्भातील 22 मे 2026 चा स्टॉक रिपोर्ट समोर आलाय. या अहवालानुसार शहरात पेट्रोलचा एकूण साठा 21 लाख 78 हजार लिटर होता. त्यापैकी 6 लाख 61 हजार लिटर विक्री झाली आहे, तर सध्या 15 लाख 17 हजार लिटर पेट्रोल शिल्लक आहे. तर 7 लाख 65 हजार लिटर पेट्रोल ट्रान्झिटमध्ये असल्याची माहिती आहे. डिझेलचा एकूण साठा 25 लाख 80 हजार लिटर होता. त्यापैकी 12 लाख 72 हजार लिटर डिझेलची विक्री झाली. सध्या 13 लाख 8 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून 12 लाख 55 हजार लिटर डिझेल ट्रान्झिटमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.
याविषयी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, डिझेल मिळत नसल्याची तक्रार पंपावरून मिळाली होती. शेतकरी डिझेल घेण्यासाठी तासन् तास पंपावर उभे आहेत. त्यांना इंढन मिळत नाहीये. काही जण तर भाकरी बांधून आलेत. शेतकऱ्यांना डिझेल नसल्याचं सांगण्यात येतं, पण निनाद साठा संपल्याचा पुरावा दाखवला पाहिजे, पण पेट्रोल चालक साठ्याची माहिती न देता पळून गेला अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.