CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNGही महागला, जाणून घ्या नवीन दर

CNG Price Hike Today: गेल्या १० दिवसांमध्ये CNGच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. वाहन चालक आणि रिक्षाचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
CNG Price Hike Today
CNG Price Hikegoogle
Published On

सध्याची महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसलाय. त्यात आता पेट्रोल डिझेलनंतर सीएनजीच्या दरातही बदल झालेले पाहायला मिळत आहेत. हा बदल नक्कीच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही. गेल्या १० दिवसांमध्ये सिएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ होताना दिसत आहे. कालपर्यंत ही किंमत ८०.०९ रुपये प्रतिकिलो सीएनजी होता. यात आता १ रुपयाने वाढ झालेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, CNG ची ही वाढ जरी लहान वाटत असली तरी रोजच्या या वाढीमुळे एकूण रुपयात वाढ होत आहे. हा आकडा काहीच दिवसात १०० रुपयांपर्यंतही पोहोचेल अशी शक्यता आहे. याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर फटका बसेल. नुकतेच काही भागात रिक्षाचं भाडं वाढवण्यात आलं आहे. तसेच वाहन चालकांच्याही खिशाला कात्री लागलेली यामध्ये दिसत आहे. हे बदललेले दर दिल्लीतले आहेत.

CNG Price Hike Today
ATM Alert: ATMमध्ये डेबिट कार्ड अडकल्यानंतर घाबरू नका; फक्त ६ महत्वाची कामे लगेच करा

सरकारने १५ मे रोजी CNGच्या दरात २ रुपयांनी वाढ केली. पुढे ही वाढ १८ मे रोजी १ रुपयाने पुन्हा वाढवण्यात आली. याचा अर्थ १५ मे पासून सीएनजीच्या दरात ही तिसऱ्यांदा वाढ होत आहे. म्हणजेच सीएनजीहा एकूण ४ रुपयांनी महागला आहे.

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. यामध्ये पेट्रोल ८७ रुपयांनी तर डिझेल ९१ रुपयांनी महाग झालं आहे. १० दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. एकूण ५ रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे. तर ही महागाई आणखी किती रुपयांनी वाढेल याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष आहे. त्यातच सरकारने इंधन तुटवडा नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील सीएनजीचे दर ८१.०० रुपये प्रति किलो आहेत.

पुण्यातील सीएनजीचे दर ९२.५० रुपये प्रति किलो आहेत.

साताऱ्यातील सीएनजीचे दर ९५.५० रुपये प्रति किलो आहेत.

कोल्हापूरमधील सीएनजीचे दर ९६.९५ रुपये प्रति किलो आहेत.

ठाण्यातील सीएनजीचे दर ८१.०० रुपये प्रति किलो आहेत.

CNG Price Hike Today
Jio Recharge: 198 रुपयांमध्ये दिवसाला 2 GB डेटा अन् मिळणार या विशेष सुविधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com