नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नांदगावमध्ये महायुतीकडून सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघासाठी उमेदवारीसाठी समीर भुजबळ इच्छुक होते. मात्र, सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर झाल्याने समीर भुजबळ हे वेगळी चूल मांडणार आहेत. समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष लढणार असल्याचं निश्चित झालं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष लढणार असल्याचं निश्चित झालंय. या मतदारसंघातून ठाकरे गटाने गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारीनंतर समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे निश्चित केले. समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीला मोठा फटका बसणार आहे. समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतल्याने महायुतीत बंडखोरी झाली आहे. सुहास कांदे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम करणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. समीर भुजबळ यांनी वेगळी भूमिका घेतल्याने नांदगाव मतदारसंघात २८ तारखेला हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्राम रंगण्याची शक्यता आहे. येत्या २८ तारखेला समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरणार आहेत.
विद्यमान आमदार सुहास कांदे देखील २८ तारखेला मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याचदिवशी समीर भुजबळ देखील अर्ज भरणार आहेत. दोन्ही उमेदवार एकाच दिवशी नांदगावमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. समीर भुजबळ यांनी आज अपक्ष अर्ज घेतला आहे. समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने नांदगावमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.