Nandgaon Assembly Constituency : समीर भुजबळ यांचं ठरलं, निवडणूक लढवण्याबाबत काय घेतला निर्णय?, पाहा Video

Sameer Bhujbal News : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीकडून ही जागा सुहास कांदे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे यावर समीर भुजबळ काय भूमिका घेतात हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

मागील काही दिवसांपासून समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेने काल नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावर समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यावर समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपला निर्णय घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी समीर भुजबळ स्वत: येवला येथे नियोजन करत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावरच समीर भुजबळ आपल्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर भूमिका घेतील असं सूत्रांनी सांगितलं आहे. वेळप्रसंगी समीर भुजबळ हे नांदगावातून अपक्ष निवडणूक लढवतील असं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com